 
                                                                 Explosion At Army Firing Range: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) दतिया जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दतिया येथील आर्मी फायरिंग रेंज (Army Firing Range) मध्ये झालेल्या स्फोटात (Explosion) एका अल्पवयीन तरुणाचा मृत्यू झाला आहे. यासोबतच आणखी दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक अधिकारी आणि लष्कराचे जवान परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. याशिवाय, पुढील सुरक्षा उपाययोजनांची खात्री केली जात आहे.
स्फोट कसा झाला?
शुक्रवारी दतिया जिल्ह्यातील लष्कराच्या फायरिंग रेंजमध्ये दारूगोळ्याचा स्फोट झाला. या अपघातात 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याच वेळी, आणखी दोन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात असे दिसून आले की, बळींपैकी एकाने जमिनीवर पडलेला न फुटलेला दारूगोळ्याचा तुकडा उचलला होता. या दरम्यान त्याचा स्फोट झाला. (हेही वाचा - Explosion In Bhandara's Ordinance Factory: महाराष्ट्रातील भंडारा येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत भीषण स्फोट; किमान पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती (Video))
जखमींवर उपचार सुरू -
दरम्यान, अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) सुनील कुमार शिवहरे यांनी या घटनेची माहिती दिली आहे. सकाळी नऊ वाजता जैतपूर गावाजवळ ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले आहे. हा परिसर दातिया शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या बसई पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. अपघातात जखमी झालेल्या दोघांना झाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फायरिंग रेंजच्या आसपासच्या गावांमध्ये राहणारे लोक अनेकदा दारूगोळा गोळा करतात आणि तो भंगार म्हणून विकतात. परंतु, हे अत्यंत धोकादायक आहे. कारण न फुटलेल्या दारूगोळ्याचा अचानक स्फोट होऊ शकतो. त्यामुळे परिसरातीस नागरिकांना यासंदर्भात जागृत करण्यात आले आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
