भारतीय रेल्वेने (Indian Railway) कितीही नव्या सोयी सुविधा जनतेसाठी उपलब्ध करून दिल्या, तरी याबाबतच्या तक्रारी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता भारतीय रेल्वेच्या शताब्दी एक्सप्रेसमधून धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ही घटना मंगळवारची आहे, मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये (Mumbai-Ahmedabad Shatabdi Express) ब्रेकफास्ट केल्यावर, छत्तीस प्रवाशांची प्रकृती खराव झाली आहे.
प्रवाश्यांना न्याहारीमध्ये चक्क बुरशीयुक्त ब्रेड देण्यात आला होता. तो खाल्ल्याने प्रवाश्यांनी तब्येत बिघडली असल्याची तक्रार केली आणि खळबळ उडाली. सूरत स्टेशनवर डॉक्टरांकडून प्रवाश्यांची तपासणीही करण्यात आली. आता असा नाश्ता पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात रेल्वेने कारवाई सुरू केली आहे.
Disgusting breakfast being served by the catering team of Shatabdi Express - 12009. The staff deliberately served expired food products during the meals. It can't get more pathetic than this. The authorities are absolutely not bothered about health issues.#irctc#PiyushGoyal pic.twitter.com/YRiIfIcjxo
— Atul Rane (@Aturane88) January 7, 2020
जनसंपर्क अधिकारी खिराजराज मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून 40 महिलांचा एक गट सकाळी मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेसमध्ये सूरत सहलीसाठी जात होता. त्यादरम्यान, पॅन्ट्री कारमधील महिलांनी ब्रेकफास्टसाठी ब्रेड आणि बटर घेतला, परंतु न्याहारी केल्यानंतर पाच महिलांना उलट्या होऊ लागल्या. त्यांच्यावर सूरत रेल्वे स्थानकात त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि ब्रेकफास्टचा परतावा देण्यात आला. हळू हळू इतर प्रवाशांनीही याबाबत तक्रार केली. महिलांच्या तक्रारीवरून वडोदरा स्थानकात पॅन्ट्री कारच्या व्यवस्थापकाकडून आवश्यक कारवाई केली जात आहे. (हेही वाचा: रेल्वे स्टेशनवरील खाद्यपदार्थांचे दर महागले; 28 मार्च नंतर जेवणही महागणार)
याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'या घटनेनंतर आयआरसीटीसी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे आणि कंत्राटदाराला दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे, तसेच हा करार संपुष्टात आणण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे.' त्यानंतर ट्रेनमध्ये सर्व्ह केल्या जाणार्या इतर खाद्यपदार्थाचे नमुने एकत्र करुन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. मात्र या घटनेसंदर्भात रेल्वेकडून देण्यात येत असलेल्या सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.