Arvind Kejriwal | PTI

राजधानी दिल्लीमध्ये (Delhi ) अत्यंत वेगवान हालचाली घडत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या निवस्थानी अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थात इडीचे पथक दाखल झाले आहे. गुरुवारी (21 मार्च) सायंकाळी दाखल झालेले हे पथक अबकारी धोरण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी पोहोचले आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात मात्र त्यांना अटक केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची मागणी फेटाळून लावत अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तीच्या कारवाईपासून संरक्षण देण्यास नकार दिला. त्यानंतर पुढच्या काहीच तासांमध्ये अंमलबजावणी संचालनालय पथक तत्काळ कारवाई करत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवास्थान गाठले. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, तपशीलानुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अधिकारी केजरीवाल यांना या प्रकरणात समन्स बजावण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. (हेही वाचा, ED Summons To Arvind Kejriwal: जामीन मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू धोरण प्रकरणी ईडीकडून नववे समन्स)

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ईडीचे अधिकारी केजरीवाल यांना या प्रकरणात समन्स बजावण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. अबकारी धोरण प्रकरणात ईडीला केजरीवाल यांची चौकशी करायची आहे. त्यासाठी चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीने केजरीवाल यांना अनेक वेळा समन्स पाठवले होते. मात्र, त्यांनी ते वगळले होते. तसेच, ईडीच्या चौकशीला जाणेही त्यांनी टाळले होते. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर हे समन्स देण्यासाठी ईडीचे अधिकारी त्यांच्या निवास्थानी दाखल झाले. (हेही वाचा, Delhi CM Arvind Kejriwal 8 समन्सनंतर पहिल्यांदाच ED ला उत्तर देण्यास तयार; समोर ठेवली 'ही' अट)

दरम्यान, सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ईडीचे अधिकारी जरी समन्स बसावण्यास आल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या निवासस्थान आणि परिसराची झडती घेतली जात आहे. त्यांची काही चौकशीही केली जाईल. मात्र, काही वेळ झडती घेतल्यानंतर आणि चौकशी केल्यानंतर त्यांना पुढील चौकशीसाठी ईडी कार्यालयात घेऊन जाण्याचीही शक्यताही या वृत्तात वर्तविण्यात आली आहे. ईडीने कारवाई करण्यापूर्वी, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि मनोज जैन यांच्या खंडपीठाने केजरीवाल यांना या प्रकरणात जबरदस्तीच्या कारवाईपासून कोणतेही संरक्षण देण्यास नकार दिला. त्यानंतर पुढच्या काहीच तासात ईडी सक्रीय झाली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचे निवास्थान गाठले. दिल्ली हायकोर्टाच्या खंडपीठाने आप नेत्याचा अर्ज 22 एप्रिल रोजी पुढील विचारासाठी सूचीबद्ध केला जेव्हा समन्सला आव्हान देणारी त्यांची मुख्य याचिका सुनावणीसाठी निश्चित केली गेली आणि ईडीला त्याचा प्रतिसाद दाखल करण्यास सांगितले.

एक्स पोस्ट

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ते पदावर असताना ईडीने अटक केली होती. पदावर असताना मुख्यमंत्र्यांना अटक होण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. केजरीवाल यांच्यावरही तशाच पद्धतीने कारवाई होणार का, याबातब अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.