EPFO | (Photo credit: archived, edited, representative image)

EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाने (Employees Provident Fund Organisation) भविष्य निर्वाह निधी दावा निकाली काढण्याच्या बाबतीत इतिहास रचला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 5 कोटींहून अधिक दावे निकाली काढले आहेत, हा एक विक्रम आहे. कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे.

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) प्रथमच 5 कोटी रुपयांहून अधिक दावे निकाली काढत ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये, EPFO ​​ने 2,05,932.49 कोटी रुपयांचे 5.08 कोटी दावे निकाली काढले आहेत, जे 2023-24 या आर्थिक वर्षातील 1,82,838.28 कोटी रुपयांच्या 4.45 कोटी दाव्यांपेक्षा अधिक आहे. कामगार मंत्री म्हणाले, दावा निकाली काढण्याची प्रक्रिया आणि तक्रार निवारणाच्या दिशेने EPFO ​​ने उचललेल्या परिवर्तनात्मक सुधारणांच्या पावलांमुळे हे यश मिळू शकले आहे.

पाहा पोस्ट -

मनसुख मांडविया म्हणाले, आम्ही ऑटो सेटलमेंट दाव्यांची मर्यादा आणि श्रेणी वाढवणे, सदस्यांच्या प्रोफाइलमधील बदल सुलभ करणे, भविष्य निर्वाह निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ करणे आणि KYC अनुपालन प्रमाण सुधारणे यासारखी पावले उचलली आहेत. या सुधारणांमुळे EPFO ​​च्या कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली आहे.