TCS मध्ये Work From Home Policy बंद झाल्याने मोठ्या प्रमाणात महिला कर्मचार्‍यांचे राजीनामे? पहा  TCS HR Milind Lakkad काय सांगतात
TCS | (Photo Credit- Wikimedia Commons)

कोरोना संकटानंतर लोकांच्या आयुष्यामध्ये अनेक बदल झाले आहे. प्रामुख्याने नोकरदार वर्गामध्ये करियर कडे बघण्याच्या अनेक गोष्टीत बदल झाले आहेत. अनेकांना वर्क फ्रॉम होमची (Work From Home) सवय लागली आहे. आता कोरोना संकट दूर झाले असले तरीही कामाच्या ठिकाणी अनेकांना वर्क फ्रॉम होम सोयिस्कर वाटतं. भारतात आयटी सेक्टर मध्ये दबदबा असलेल्या Tata Consultancy Services देखील आता याच्याशी निगडीत गोष्टींशी झगडत आहेत. टीसीएस ने त्यांच्या कर्मचार्‍यांना रिमोटली म्हणजेच वर्क फ्रॉम होम करण्याच्या सुविधेला बंद केलं आहे. वर्क फ्रॉम होम बंद झाल्याने टीसीएस मध्ये अनेक महिला कर्मचार्‍यांनी कामाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.

टीसीएस मध्ये महिलांना अनेक कामाच्या संधी दिल्या जातात. तसेच कामाच्या ठिकाणी लिंगभेद टाळून मोठ्या जबाबदार्‍या देखील दिल्या जातात पण आता वर्क फ्रॉम होम बंद केल्याने अनेकींना हा निर्णय रूचलेला नाही. यानंतर अनेक महिला कर्मचार्‍यांनी कामाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.

टीसीएस एचआर हेड Milind Lakkad यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्क फ्रॉम होम बंद केल्यानंतर राजीनामा देण्यामध्ये महिला कर्मचारी अधिक होत्या. पण हे कारण अनेक कारणांपैकी एक आहे. पण भेदभावातून महिला कर्मचारी राजीनामा देत असल्याचं इथे घडत नाही. टीसीएस मध्ये पुरूषांच्या तुलनेत स्त्रीया राजीनामा देण्याचं प्रमाण कमी आहे. पण आता चित्र बदललं आहे. नक्की वाचा: WFH or WFO: ऑफीसमधून काम करताना 25% कर्मचारी कामापेक्षा देतात 'या' गोष्टीला प्राधान्य; घ्या जाणून .

टीसीएस मध्ये 6 लाख कर्मचारी काम करतात. 35% महिला कर्मचारी आहेत. कॉरपरेशनने आर्थिक वर्ष 2023 मध्ये 38.1% महिला कर्मचारी कायम ठेवल्या आहेत. शिवाय, सर्वोच्च पदांपैकी सुमारे 3/4 महिला आहेत. येथे हे लक्षात घेतले पाहिजे की मागील आर्थिक वर्षात TCS ने 20% पेक्षा जास्त कर्मचारी गमावले आहेत.

जग जागतिक मंदीच्या दिशेने वाटचाल करत असताना प्रत्येक कर्मचारी संकटाचा सामना करत आहे. रिमोटली काम करण्याच्या कल्पनेला कर्मचाऱ्यांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम बंद करणं हे राजीनामे वाढवणारं ठरत आहे.