Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारतात आलेली कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus  Second Wave) परतवून लावण्यासाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. दरम्यान कोरोना विरुद्धचा लढा यशस्वी करण्यासाठी भारतात एक नवीन कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शन दाखल झाले आहेत. Eli Lilly असे या इंजेक्शनचे नाव असून याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. अमेरिकन औषध निर्माता कंपनी असलेल्या एलि लिली अँड कंपनीच्या अँटिबॉडी कॉकटेल इंजेक्शनचा भारतातील मध्यम आणि सामान्य तीव्रतेच्या कोरोना रुग्णांसाठी वापर करण्याला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे कोरोनाशी सुरू असलेल्या भारताच्या लढ्यामध्ये अजून एक औषध आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी आलं आहे.

काही दिवसांपूर्वी रॉश इंडियाच्या कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनला आपातकालीन वापर म्हणून भारतात मान्यता दिल्यानंतर आता लिली इंजेक्शनला मान्यता देण्यात आली आहे. रॉश इंडियाच्या कॉकटेल अँटिबॉडीजप्रमाणेच लिली कंपनीच्या कॉकटेल अँटिबॉडीजमुळे देखील काहीसा असाच परिणाम साधला जाणार आहे.हेदेखील वाचा- जुलै, ऑगस्टच्या मध्यावर भारतात कोविड लसींचा मुबलक साठा असेल, दिवसाला 1 कोटी लोकांना लस देण्याची क्षमता: ICMR च्या Balram Bhargava यांची माहिती

नेमकं हे औषध काय करणार?

रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, लिली कंपनीच्या मोनोक्लोनल अँटिबॉडी इंजेक्शनमध्ये बॅमलॅनिविमॅब आणि इटेसेविमॅब या दोन प्रकारच्या अँटिबॉडी इंजेक्शनचं मिश्रण करून डोस तयार करण्यात आला आहे. या प्रकारच्या मोनोक्लोनल अँटिबॉडीज करोनाच्या विषाणूचा सामना करण्यासाठी शरीरात नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या अँटिबॉडीजची नक्कल तयार करतात. त्यामुळे शरीराला करोनाच्या विषाणूंचा सामना करण्यासाठी मदत मिळू शकते.

दरम्यान, लिली कंपनीकडून जाहीर करण्यात आल्याप्रमाणे अधिकाधिक रुग्णांना करोनाचा सामना करण्यासाठी उपचार मिळावेत, यासाठी हे इंजेक्शन मोफत पुरवता येतील का, याची चाचपणी सुरू आहे. त्यासंदर्भात कंपनीकडून केंद्र सरकारसोबत बोलणी सुरू असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.