Mahadev App Betting Case: महादेव सट्टेबाजी प्रकरणी (Mahadev App Betting Case) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय एजन्सीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Money Laundering Act) महादेव सट्टा प्रकरणात 387.99 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. संलग्न मालमत्तेमध्ये मॉरिशसस्थित कंपनी टॅनो इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज फंडाची जंगम मालमत्ता देखील समाविष्ट आहे. एफपीआय आणि एफडीआयच्या माध्यमातून हरी शंकर टिब्रेवालमध्ये गुंतवणूक करण्यात आली होती.
दरम्यान, ईडीने छत्तीसगड, मुंबई आणि मध्य प्रदेशातील स्थावर मालमत्ताही जप्त केल्या आहेत. या सर्व मालमत्ता प्रवर्तक, पॅनेल ऑपरेटर आणि अनेक बेटिंग ॲप्स आणि वेबसाइट्सच्या सहयोगींच्या आहेत. ईडीच्या तपासात महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप सिंडिकेट म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये व्यक्ती स्वत:ची नोंदणी करते. त्यानंतर त्याचा यूजर आयडी तयार होतो. ॲपमध्ये निनावी बँक खात्यांचे एक जटिल नेटवर्क आहे. याद्वारे तो मनी लाँड्रिंग करतो. हे ॲप ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून सट्टेबाजीला प्रोत्साहन देत असल्याचे देखील तपासात समोर आले आहे. (हेही वाचा -Mahadev Online Betting Case: महादेव अॅपवर ED ची मोठी कारवाई, कोलकाता-मुंबईसह अनेक शहरांमध्ये छापे; 417 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त)
आतापर्यंत 2,295.61 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त -
महादेव सत्ता प्रकरणात ईडीने आतापर्यंत 2,295.61 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त तसेच गोठवली आहे. यामध्ये 19.36 कोटी रुपयांची रोकड, 16.68 कोटी रुपयांच्या वस्तू आणि एकूण 1,729.17 कोटी रुपयांच्या बँक बॅलन्स आणि सिक्युरिटीजसह चल मालमत्तेचाही समावेश आहे. (हेही वाचा - Mahadev App Betting Case: तब्बल 144 कोटी रुपये होते Saurabh Chandrakar च्या लग्नाचे बजेट, सेलिब्रेटींची केली दिशाभूल; ED च्या आरोपपत्रात समोर आली धक्कादायक माहिती)
महादेव बेटिंग प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक -
महादेव बेटिंग प्रकरणात ईडीने आतापर्यंत 11 जणांना अटक केली आहे. याशिवाय रायपूरच्या विशेष पीएमएलए न्यायालयात चार फिर्यादी तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत. यापूर्वी, केंद्रीय एजन्सीने 142.86 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. तथापी, गेल्या वर्षी, ईडीने महादेव सत्ता प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग नेटवर्कवर छापा टाकला होता. या काळात 5.39 कोटी रुपयांची रोकड आणि 15.59 कोटी रुपयांचा बँक बॅलन्स सापडला होता.