PM Modi यांच्या आर्थिक समितीचे सल्लागार सुरजीत भल्ला यांचा राजीनामा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य सुरजीत भल्ला (Photo CRedit: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य सुरजीत भल्ला (Surjit Bhalla) यांनी राजीनामा दिला आहे. यापूर्वी सोमवारी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल (RBI Governor Urjit Patel) यांनी राजीनामा दिला. ट्विटरच्या माध्यमातून सुरजीत यांनी राजीनामा दिल्याचा खुलासा केला. सुरजीत भल्ला यांच्या राजीनाम्यामुळे मोदी सरकारला आणखी एक धक्का बसला आहे. RBI Governor उर्जित पटेल यांचा राजीनामा

मोदी सरकारने सप्टेंबर 2017 मध्ये आर्थिक सल्लागार समितीची स्थापना केली होती. डॉ. विवेक देबरॉय या समितीचे अध्यक्ष आहेत.