Dry Days | (Photo credit: archived, edited, representative image)

Delhi Assembly Election 2025: राजधानी दिल्ली या विधानसभा निवडणूक 2025 ला सामोरी जात आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कामय ठेवण्यासाठी राजधानीचे शहर आणि संपूर्ण राज्यात येत्या 3, 5 आणि 8 फेब्रुवारी रोजी ड्राय डे (Dry Day) असणार आहे. ज्यामुळे या काळात दिवसाच्या संपूर्ण कालावधीकरिता मद्यविक्री बंद (Dry Day In Delhi) असणार आहे. सहाजिकच मद्यप्रेमींना दारु मिळणार नाही. अणुक्रमे तीन आणि पाच रोजी मतदानचा दिवस असणार आहे. तर, आठ फेब्रुवारी रोजी मतमोजणी म्हणजेच निकाल असणार आहे. परिणामी राज्य सरकारने या कालावधीत मद्यविक्री बंद ठेवण्याबाबत आदेश जारी किले आहेत.

उत्पादन शुल्क आयुक्तांचे आदेश

दिल्ली सरकारने एका आदेशाद्वारे निश्चित करुन दिलेल्या दिवशी दारु विक्री करण्यास बंदी असल्याचे जाहीर केले आहे. दिल्ली उत्पादन शुल्क आयुक्तांनी अलिकडेच जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेत 70 सदस्यीय दिल्ली विधानसभा निवडणूक काळात मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी विविध उत्पादन शुल्क परवान्यांसाठी उत्पादन शुल्क नियम-2010 अंतर्गत "ड्राय डे" घोषित केले आहेत. (हेही वाचा, Delhi Assembly Election Schedule: दिल्ली विधानसभा निवडणूक वेळापत्रक;5 फेब्रुवारीला मतदान, 8 फेब्रुवारीला मतमोजणी, जाणून घ्या संपूर्ण तपशील)

मतदान आणि मतमोजणी काळात ड्राय डे

दिल्ली उत्पादन शुल्क आयुक्तांनी जारी केलेले हे आदेश, 3 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 ते 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजेच मतदान संपण्याच्या वेळेपासून संपणाऱ्या 48 तासांसाठी लागू असतील. या कालावधीत संपूर्ण ड्राय डे पाळण्याचा आदेश देण्यात आला आहे आणि पुन्हा 8 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा दिवस असल्याने ड्राय डे पाळण्यात येईल.

खासगी ठिकाणांनाही आदेश लागू

ड्राय डे कालावधीत राजधानीचे शहर दिल्ली आणि उर्वरीत संपूर्ण राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुकान, खासगी ठिकाण, हॉटेल, पब्ज, उपहारगृह अथवा क्लबमध्ये किंवा दारुविक्रीसाठी अधिकृत, अनिधिकृत ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी मद्य उपलब्ध करुन दिले जाणार नाही. तसेच त्याची विक्री होणार नाही. तशा विक्रीस परवानगी दिली जाणार नाही. जर कोणी आदेशाचे उल्लंघन करताना आढळून आल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

उल्लेखनीय असे की, उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या आदेशात असेही म्हटले आहे की, गैर-मालकीचे क्लब, स्टार हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतरांद्वारे चालवले जाणारे हॉटेल्स, जरी त्यांना दारू बाळगण्यासाठी आणि पुरवण्यासाठी वेगवेगळ्या श्रेणींचे परवाने दिले गेले असले तरीही, त्यांनाही दारू देण्याची परवानगी दिली जाऊ नये.

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकूण 70 जागांसाठी मतदान पार पडत आहे. ज्यासाठी माजी मख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेला आम आदमी पक्ष निवडणुकीस सामोरे जात आहे. विद्यमान स्थितीत आतिशी मार्लेना या दिल्ली येथील आपच्या मुख्यमंत्री आहेत. तर केंद्रात सत्ताधारी असलेला भाजप आपणच प्रमुख विरोधी पक्ष असल्याचा दावा करत मैदानात उतरला आहे. प्रदीर्घ काळ सत्तेत राहिलेला काँग्रेस आम आदमी पक्ष आणि भाजप यांसोबत जोरदार लढत करत पुन्हा एकदा राजधानीचे शहर असलेल्या राज्यात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. राजधानीतील जनता कोणाला प्रतिसाद देते हे येत्या आठ फेब्रुवारी रोजीच कळणार आहे.