ओडिशा: लाखो भाविकांच्या उपस्थितीत पुरीत आज जगन्नाथाच्या रथयात्रेचा प्रारंभ; नृत्य, शिल्प साकारत भक्तांनी व्यक्त केला उत्साह (Photos, Videos)
Jagannath Rath Yatra at Puri (Photo Credits: ANI)

ओडिशा (Odisha) येथे भगवान जगन्नाथ यांच्या 142 व्या रथयात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. यासाठी जगन्नाथ पुरीत भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. आषाढ शुक्ल पक्ष द्वितीयेला या रथयात्रेचे आयोजन करण्यात येते. आज संध्याकाळी 4 वाजता रथयात्रेला सुरुवात होईल. या निमित्तानेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देखील अहमदाबादमधील जगन्नाथ मंदिरात जावून सपत्नीक दर्शन घेतले. तर रथेयात्रेच्या निमित्ताने पुरी येथील समुद्रकिनारी वाळूतून जगन्नाथाचे मंदिर आणि भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या.

ANI ट्विट:

 

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी चोख व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. रथयात्रेतील प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसंच रथयात्रेसाठी रथ बनवण्याचे काम गेल्या महिनाभरापासून सुरु आहे. भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांचे तीन रथ तयार करण्यात आले असून ते लिंबाच्या झाडाच्या लाकडापासून बनवले आहेत.

 

विशेष म्हणजे श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने या रथयात्रेविषयी आणि रथयात्रेच्या इतिहासाविषयी माहिती देण्यासाठी मंगळवारपासून एक वेबसाईटही सुरु केली आहे.