उन्नाव बलात्कार प्रकरण: पीडीतेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी आमदार कुलदीप सेंगर सह 7 दोषी; 12 मार्चला सुनावणार शिक्षा
कुलदीप सिंह सेंगर (Photo Credit: IANS)

उत्तर प्रदेश मधील उन्नाव येथील बलात्कार (Unnao Rape) पीडितेच्या वडीलांच्या हत्येप्रकरणी आज तीस हजारी कोर्टाने (Tis Hazari Court)  कुलदीप सेंगर (MLA Kuldeep Singh Senger) याला दोषी ठरवण्यात आलं आहे. दरम्यान कुलदीपसोबत 11 आरोपी होती. त्यापैकी 4 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर 7 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. कुलदीप सेंगर याला कलम 304 आणि कलम 120b अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी 12 मार्च दिवशी शिक्षा सुनावली जाणार आहे. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टामध्ये निकाल देताना न्यायाधीशांनी सीबीआयचं कौतुक केलं आहे. तर हे प्रकरण माझ्या आयुष्यातील कसोटीपूर्ण ट्रायलपैकी एक असल्याचं म्हटलं आहे. बलात्कार पीडितेच्या वडिलांचं 9 एप्रिल 2018 दिवशी निधन झालं होतं. त्यावेळी ते न्यायालयीन कोठडीमध्ये होते. दिल्ली: उन्नाव बलात्कार प्रकरणात माजी भाजप आमदार कुलदीप सेंगर दोषी; शशी सिंह यांची निर्दोष सुटका.  

'सेंगरचं पीडितेच्या वडिलांची हत्या करण्याचा कोणताही हेतू नव्हता मात्र ज्या पद्धतीने त्यांना मारण्यात आले आहे ते बिभित्स होते. त्यामुळे त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. असे न्यायाधीशांनी निकाल देताना म्हटले. दरम्यान या प्रकरणामध्ये 55 जणांची साक्ष घेण्यात आली. न्यायालयाने बलात्कार पीडितेचे काका, आई, बहिण यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.

ANI Tweet

उत्तर प्रदेश सह उन्नाव बलात्काराने दोन वर्षांपूर्वी भारत देश हादरून गेला होता. बलात्कार प्रकरणी सुनावणीसाठी कोर्टात जाताना पीडितेला जाळण्याचा प्रयत्न झाला होता, दुर्दैवाने या मध्ये पीडिता 90 टक्के भाजली गेली होती. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता पीडितेला हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.