जम्मू-काश्मिर (Jammu-Kashmir) मधील सकाळी श्रीनगर (Srinagar) येथे आज शनिवारी(2 मार्च) हिमवृष्टी झाली. तर दिल्लीत पावसाने हजेरी लावल्याने रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. 300 किमी अंतर फक्त एक मार्गी वाहतुकीसाठी सुरु ठेवण्यात आल्याची माहिती आयएएनएस (IANS) या वृत्ताने दिली आहे. तसेच दिल्ली (Delhi) मध्ये ही कडाक्याच्या पावसाने हजेरी लावली आहे.
तर जम्मू-काश्मिर येथील वाहतूक विभागाने असे सांगितले की, हिमवृष्टीमुळे वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे. जवळजवळ 5-6 इंच असलेल्या बर्फाची वृष्टी बिनीहाल सेक्टरमध्ये होत असल्याचे सांगिले जात आहे. पंरतु एक मार्गाने श्रीनगर येथील वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे.
#WATCH Jammu & Kashmir: Srinagar receives fresh snowfall. pic.twitter.com/Q91AjQoNiV
— ANI (@ANI) March 2, 2019
श्रीनगर येथील सध्याचे तापमान हे 3 अंश सेल्सिअस असून कमीत कमी तापमान हे 6 अंश नसल्याचे म्हटले जात आहे.उत्तर भारतात अतिवृष्टी आणि हिमवर्षाव होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. खासकरुन जम्मू-काश्मिर,हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे वातावरणात बदल होऊन पावसाची शक्यता आहे. तसेच दिल्ली येथे ही हवामान बदलावामुळे वातावरणात बिघाड होऊ शकतो. तर दिल्लीत गेल्या काही आठवड्यांपूर्वी हवामान खात्याने थंड वारे पुढील आठवड्यापर्यंत वाहणार असल्याची शक्यता वर्तवली होती.