राजधानी दिल्लीत (Delhi) आज सकाळी जखीरा येथे ट्रेनचे 8 डबे रुळावरून घसरले. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी बचावकार्य सुरू केलं आहे. नगर-दयाबस्ती सेक्शनवर मालगाडीचे आठ डबे रुळावरून घसरले (Train Derail) आहेत. सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू झालं आहे. मालगाडीत लोखंडी पत्र्यांचे रोल्स भरलेले होते. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे (Train Accident) वृत्त नाही. ही घटना सकाळी बारा वाजेच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. ( Karnataka Shocker: पत्नीच्या इन्स्टाग्राम रील्सला कंटाळून पतीने केली आत्महत्या; सोशल मीडियावरून चालू होता अनेक दिवस वाद)
पाहा पोस्ट -
#WATCH | Eight wagons of a goods train derail on Patel Nagar-Dayabasti section in Delhi area. The incident occurred near the Zakhira flyover.
(Video source: Delhi Police) pic.twitter.com/cQieCNsQAV
— ANI (@ANI) February 17, 2024
रूळावर कोणतीही जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बचावकार्य सुरू आहे. परंतु अजून जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दल आणि रेल्वेने मदतकार्य सुरू केलं आहे.ही मालगाडी सकाळी 11.55 च्या सुमारास झाखिरा उड्डाणपुलाजवळ रुळावरून घसरली. त्यामुळे ती पलटी उलटली झाली आहे. अपघातस्थळावरील एका व्हिडिओमध्ये रेल्वे रुळावरून खाली घसरलेल्या बोगी दिसत आहेत.
मागील वर्षी 6 ऑक्टोबर 2023 रोजी दिल्लीत मालगाडीला अपघात झाला होता. त्यामुळे बराच वेळ गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले होते. तेव्हा अनेक गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला होता. अपघाताबाबत चौकशी समितीही स्थापन करण्यात आली होती