प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

राजधानी दिल्ली येथे तापमानाचा पारा 20 डिग्री खाली उतरल्याने थंडीचा रेकॉर्डब्रेक करण्यात आला आहे. तर शनिवारी दिल्ली मधील अन्य ठिकाणी तापमान 2 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्याने नागरिक कुडकुडले आहेत. या थंडीच्या गारठ्यामुळे हवामान खात्याकडून दिल्लीसह उत्तर भारतातील 6 ठिकाणी रेड अलर्ट जाहीर केला आहे. 1977 नंतर 2019 मध्ये दुसऱ्या वेळेस रेकॉर्डब्रेक थंडी झाली आहे. तर डिसेंबर महिन्यात 18 तारखेला तापमानाचा पारा 12.3 अंश सेल्सिअस राहिला होता.

डिसेंबर महिन्याच्या सुरुवाती पासून दिल्लीसह अन्य ठिकाणी कडाक्याची थंडी सुरु झाली आहे. या थंडीतील वातावरण पाहता हवामान खात्याने पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार येथे रेड अलर्ट जाहीर केले आहे. रेड अलर्ट जेव्हा घोषित केला जातो त्यावेळी मैदानी भागातील तापमानाचा पारा 16 अंश सेल्सिअसच्या खाली उतरला जातो. हिमालय क्षेत्रातून सातत्याने होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनुळे मैदानी क्षेत्रात थंडी अधिक जाणवत आहे.(दिल्लीत गेल्या 118 वर्षातील थंडीचा रेकॉर्डब्रेक, तापमानाचा पारा 2.4 डिग्रीवर पोहचला)

ANI Tweet:

स्कायमेट हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 1901 ते 2018 पर्यंत फक्त 4 वेळा म्हणजेच 1919, 1929, 1961 आणि 1997 मध्ये डिसेंबर महिन्यात तापमानाचा पारा 20 अंशाच्या खाली गेला होता. मात्र 30 डिसेंबर नंतर तापमानात बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पण पुढील 48 तास वातावरणात कोणताही बदल होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.