दिल्ली: सोने-चांदीच्या किंमतीत बदल, जाणून घ्या आजचे नवे दर
Gold Jewellery (Photo Credit - Wikimedia )

दिल्ली सराफा बाजारात बुधावरी सोने आणि चांदीचे दर खाली आले होते. मात्र सोन्याच्या किंमती हळूहळू वाढत असल्याने फक्त 8 रुपये प्रति 10 ग्रॅमने त्याचे दर वाढले होते. सोन्यासारखेच चांदीच्या दरात हलक्या स्वरुपाची वाढ झाली होती. एक किलोग्रॅम चांदीचे दर 14 रुपयांनी वाढले. HDFC सिक्योरिटीजच्या मते सोन्याचे आणि चांदीचे दर हळूहळू कमी किंमतीनी वाढत आहेत.

बुधवारी सोन्याचे दर 38,820 रुपये वाढून 38,828 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. बुधवारी न्युयॉर्क मध्ये सोने 1, 476.90 डॉलर प्रति औंस आणि चांदी 17.01 डॉलर प्रति औंस राहिला होता. सोन्याप्रमाणेच चांदीचे दर सुद्धा वाढले. एक किलोग्रॅम चांदीचे दर 45,653 रुपयांनी वाढून 45,649 रुपये झाले.(खूशखबर! आता सरकार ‘स्टील स्क्रॅप पॉलिसी’अंतर्गत विकत घेणार तुमचे जुने फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन)

सोन्याच्या दुकानांमध्ये सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झूबंड पाहायला मिळते. पण खरेदी केलेले सोने बनावट तर नाही ना हे तपासायचे कसे असा विचार जर तुम्ही करत असाल तर त्यावर सरकारने एक नवा नियम लागू करणार आहे. या नव्या नियमामुळे बनावट सोने विक्रीवर आळा घालून फक्त शुद्ध सोनेच बाजारात विक्रीस उपलब्ध होणार आहे.भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ही देशातील एकमेव एजन्सी आहे ज्यांना सोन्याचे दागिने हॉलमार्किंगला मान्यता आहे. आता नव्या नियमानुसार 14 कॅरेट, 18 कॅरेट आणि 22 कॅरेट असं सोन्यासाठी हॉलमार्किंग निश्चित करण्यात आलं आहे.