सोमवार (29 एप्रिल) दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव 30 रुपयांनी वाढून 32,970 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. तर चांदीच्या भावात 50 रुपयांनी कपात झाली असून 38,700 रुपये झाला आहे.
तर आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचे भाव 0.06 डॉलर्सने कमी होऊन 14.97 डॉलर्स प्रति औंस झाला आहे. त्याचसोबत स्थानिक बाजारात दागिन्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव 33 हजार रुपयांवर जाऊन पोहचला आहे.(चप्पलमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या एकाला विमानतळावरुन अटक)
मात्र औद्योगिक ग्राहकांकडून चांदीची खरेदी जास्त प्रमाणात करण्यात आली नाही. त्यामुळे 50 रुपयांनी चांदीचे दर कमी झाले आहे. तर आठ ग्रामची गिन्नीचा भाव 26,400 रुपये झाला आहे.