जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे काही देशांनी त्यांच्या सीमा प्रवाशांसाठी बंद केल्या आहेत. तसेच दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. याच पार्श्वभुमीवर भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढून 147 झाली असून विविध ठिकाणी जमावबंदी सुद्धा लागू करण्यात आली आहे. याच दरम्यान, कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांबाबत चर्चा आहे. त्यानुसार इंग्रजी वृत्तपत्र लाइव्ह मिन्ट यांच्य एका रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात गोमूत्र आणि शेणाचे दर वाढले आहेत.
रिपोर्ट नुसार, 500 रुपये लीटर गोमूत्र आणि 500 रुपयाने शेण विकले जात आहे. पश्चिम बंगाल मधील एका दुध विक्रेत्याने असा दावा केला आहे की, कोलकाता पासून 20 किमी अंतरावर रस्त्याच्या कडेला एक दुकान सुरु केले. तेथे गोमूत्र आणि शेणाची विक्री सुरु केली आहे. पण दुधापेक्षा तेथे गोमूत्र आणि शेणाला अधिक मागणी असल्याने ते 500 रुपयांनी विकले जात आहे.(दिलासादायक! कोरोना व्हायरससाठी आरोग्य मंत्रालयाकडून Anti-HIV औषधांची शिफारस; जयपूरच्या इटालियन जोडप्याला देण्यात आला डोस)
दिल्ली आणि कोलकाता यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अली नावाच्या दुकानदाराकडून एक दुकान चालवले जात आहे. अली यांनी त्यांच्या दुकानावर एक पोस्टर लावले आहे. या पोस्टवर त्यांनी गोमूत्र प्या आणि कोरोना व्हायरसपासून बचाव करा असे लिहिले आहे. अली यांनी असा दावा केला आहे की, दिल्लीमध्ये आयोजित हिंदू महासभेकडून त्यांना ही आयडिया मिळाली आहे. अली यांच्याकडे दोन गाय आहेत. एक देशी आणि एक जर्सी अशा गाई आहेत. जेव्हा अली यांनी गोमूत्र पार्टी पाहिली असती त्यांना तेथून गोमूत्र विकण्याची आयडिया मिळाली असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अखिल भारतीय हिंदू महासभेने असा दावा केला आहे की. गोमूत्रमुळे कोरोना व्हायरसपासून बचाव करता येतो. तसेच हिंदू महासभेने गोमूत्र पार्टीचे सु्द्धा आयोजन केल्याचे दिसून आले होते.