CDS Chief | Photo Credits: Twitter

जनरल बिपीन रावत यांनी आज (1 जानेवारी 2020) Chief of Defence Staff चा पदभार स्वीकारला आहे. आज त्यांच्या नव्या आणि खास गणवेशाची पहिली झलक भारतीयांना पहायला मिळाली. थोड्याच वेळापूर्वी बिपीन रावत दिल्लीत नॅशनल वॉर मेमोरिअल (National War Memorial) वर पोहचले आहेत. दरम्यान यावेळेस लष्काराकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला आहे. त्यावेळेस मीडियाशी बोलताना लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये समन्वयता ठेवण्याची जबाबदारी असल्याचं म्हटल आहे. बिपीन रावत यांच्यानंतर मनोज मुकुंद नरवणे यांची नेमणूक 28 वे लष्करप्रमुख करण्यात आली आहे. जनरल बिपीन रावत भारताचे पहिले सीडीएस; पहा Chief of Defense Staff या पदाची वैशिष्ट्यंं.

आज दिल्लीमध्ये शहिदांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर आर्मी चीफ मनोज नरवणे यांनादेखील गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यावेळेस मीडीयाशी बोलताना मानवी हकांचे संरक्षण करण्याकडे आमचा अधिक कल असेल तसेच कोणत्याही परिस्थितीत प्रतिकार करण्यासाठी सज्ज असल्याचं मनोगत त्यांनी अर्पण केलं आहे.

सीडीएस  जनरल बिपीन रावत यांना गार्ड ऑफ ऑनर 

Delhi: Chief of Defence Staff(CDS) General Bipin Rawat receives guard of honour pic.twitter.com/Wakszy5eex

आर्मी चीफ मनोज नरवणे यांची प्रतिक्रिया

दिल्लीच्या नॅशनल मेमोरिअल वॉलवर आयोजित कार्यक्रमामध्ये तिन्ही दलाचे प्रमुख देखील उपस्थित होते. लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी जून 1980 मध्ये शीख लाईट इन्फंट्रीच्या 7 व्या बटालियनच्या कमिशनचं काम देण्यत आलं होतं.त्यांच्या 37 वर्षीय सेवेमध्ये जनरल नरवणे हे देशातील पूर्व उत्तर भागात, जम्मू कश्मीर मध्ये तसेच श्रीलंकेत भारतीय सुरक्षा दलाचे सदस्य म्हणून काम करत होते.