
दिल्ली (Delhi) येथील प्रसिद्ध एम्स रुग्णालयाच्या (AIIMS Hospital) निवासी डॉक्टर संघटनेकडून हॉस्पिटल प्रशासनाने स्वसंरक्षण ड्रेस खरेदीच्या निधीत अफरातफर केल्याचा मोठा आरोप लागवण्यात आला आहे, यानुसार भारत डायनॅमिक्स तर्फे डॉक्टरांच्या स्वसंरक्षण ड्रेस साठी देण्यात आलेला 50 लाख रुपयांचा निधी हा रुग्णालय प्रशासन आणि सीएसआर विभागाने परस्पर पीएम केअर्स फंड (PM Cares Fund) मध्ये वळल्याचे म्हंटले आहे. कोरोनाचे 150 रुग्ण असलेल्या हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी न घेता केलेली ही अफरातफर म्हणजे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण आहे असेही आरोप करणाऱ्या डॉक्टरांनी म्हंटले आहे. मात्र हे सर्व दावे बिनपुराव्याचे आहेत, मुळातच भारत डायनॅमिक्स (Bharat Dynamics) कडून हॉस्पिटलला ला अद्याप कोणताही निधी त्यामुळे तो वळवण्याचा प्रश्नच येत नाही असे उत्तर हॉस्पिटल तर्फे देण्यात आले आहे. PM- केअर्स फंड साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांनी स्वतःच्या बचतीतून दिले 25 हजाराचे योगदान
प्राप्त माहितीनुसार, अलीकडेच एम्स मधील निवासी डॉक्टरांनी आपल्यासाठी वसतिगृह ते हॉस्पिटल अशी प्रवासाची सोया करण्यात यावी जेणेकरून येण्याजाणायचा वेळ वाचवता येईल अशी विनंती वजा मागणी केली होती. मात्र अद्याप त्यावरही वसतिगृह अधीक्षकांकडून पाऊले उचलण्यात आलेली नाही. दुसरीकडे आरोग्य मंत्रालयाच्या आदेशाप्रमाणे स्वसंरक्षण ड्रेस दर्जेदार असावा, ज्यामुळे डॉक्टर तसंच इतर रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊन कोरोनाची लागण होण्याची भीती राहणार नाही. जुगाड केलेले स्वसंक्षण ड्रेस चालणार नाहीत,” अशीही विनंती करण्यात आली होती मात्र त्यांनतर हा अफरातफरीचा प्रकार आढळून आला आहे.
दुसरीकडे, हॉस्पिटल कडून हा दावा खोटा ठरवला जात आहे, निवासी डॉक्टर संघटनेच्या माहितीनुसार भारत डायनॅमिक्स हे स्वसंरक्षण ड्रेसची खरेदी कऱण्यासाठी निधी देण्यास उत्सुक आहे अशी माहिती समजली होती. त्यानुसार त्यांच्याशी चर्चा सुद्धा झाली होती मात्र अद्याप प्रत्यक्ष निधी मिळालेला नाही असे हॉस्पिटल प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, एम्स रुग्णालयात सध्या 150 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.