दिल्ली: तीस हजारी कोर्टाजवळ पोलीस आणि वकिलांमध्ये राडा, फायरिंग केल्यानंतर गाड्या पेटवल्या
दिल्लीमध्ये राडा (Photo Credits-ANI)

दिल्ली (Delhi)  मधील तीस हजारी कोर्टाजवळ (Tis Hazari Court) पोलीस आणि वकिलांमध्ये जबरदस्त राडा झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी काही गाड्या सुद्धा पेटवून देण्यात आल्या आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोर्टाच्या परिसरात आणि परिसराच्या बाहेर मोबाईल वापरल्यास तोडले जात होते. तर फायरिंग केल्यानंतर यामध्ये एका वकीलाला गोळी लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. दुखापत झालेल्या वकिलाला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार असे सांगितले जात आहे की, वकील आणि पोलिसांमध्ये गाड्यांच्या पार्किंगवरुन वाद झाले. त्यानंतर परिसरात तणावपूर्ण स्थिती पहाता काही जिल्ह्यातील फोर्संना बोलावण्यात आले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. काही गाड्यांना पेटवून दिल्याने धुराचे लोट येताना दिसून येत आहेत. या दरम्यान गोळीबार सुद्धा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तर घटनास्थळाची माहिती देण्यासाठी पोहचलेल्या पत्रकारांना सुद्धा मारहाण करण्यात आले.(Delhi Air Pollution: दिल्लीमधील हवेची गुणवत्ता कमालीची घसरल्याने शाळा आणि कॉलेजेस 5 नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा सरकारचा निर्णय)

पोलिसांत आणि वकिलांमध्ये झालेल्या राड्यात एक जण जखमी झाला आहे. तसेच घटनास्थळी उभ्या असलेल्या कैद्यांच्या गाडीला सुद्धा पेटवून देण्यात आले. आग विझवण्यासाठी तातडीने अग्निशमनल दलाचा गाड्या दाखल झाल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.