भारत-चीन संबंध तणावग्रस्त असताना आज (17 जुलै) देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) लेह मध्ये पोहचले आहे. राजनाथ सिंह पुढील 2 दोन लद्दाख आणि जम्मू कश्मीरचा दौरा करणार आहेत. राजनाथ सिंह यांच्यासोबत भारताचे सीडीएस जनरल बीपीन रावत (Defence Staff General Bipin Rawat) आणि चीफ जनरल मनोज मुकुंद नरवणे (Army Chief General MM Naravane) देखील आहेत. दरम्यान संरक्षण मंत्री भारत चीन सीमेवरील LAC सोबतच LoC वर देखील पहाणी करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह मध्ये येऊन भारतीय जवानांना सरप्राईज व्हिजिट देत त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला होता. आज राजनाथ सिंह देखील सीमेवर तैनात असणार्या जवानांना भेट देणार आहेत. नक्की वाचा: PM Narendra Modi Leh Visit: विस्तारवादामुळे जगाचं मोठं नुकसान, आता विकासयुग सुरू झालंयं; PM नरेंद्र मोदी यांनी वाढवलं भारतीय जवानांचं मनोधैर्य.
ANI Tweet
Defence Minister Rajnath Singh, Chief of Defence Staff General Bipin Rawat and Army Chief General MM Naravane arrive at Leh Airport. Defence Minister is on a two-day visit to Ladakh and Jammu & Kashmir. pic.twitter.com/CXj2Pmoyu4
— ANI (@ANI) July 17, 2020
भारत - चीन सीमेवर असणार्या गलवान खोर्यामध्ये दोन्ही देशांच्या जवानांमध्ये हिंसक झडप झाली होती. 15 जूनला झालेल्या या झटापटीमध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तेव्हापासून भारत आणि चीन मध्ये संबंध तणावाचे झाले आहेत. देशामध्येही सामान्यांमध्ये या घटनेनंतर संतापाची लाट आहे.