Heart Attack NEWS PC Pixabay

Madhya Pradesh News: लोकसभा निवडणूक मतदानाचा पहिला टप्पा उद्या (19 एप्रिल) पार पडणार आहे. ठिकठिकाणी मतदान केंद्रावर जोरदार तयारी सुरु आहे. निवडणूक आयोगाकाकडून कडक सुरक्षा दल तैनात करण्यात आल्या आहे. मध्य प्रदेशातील जबळपूर, मंडाला, बाळाघाट, छिंदवाडा या ठिकाणी उद्या पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानापूर्वी मध्य प्रदेशातील जबळपूर येथून एक मन विचलित करणारी घटना समोर आली आहे. मंडला येथील मतदान केंद्रावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा- बुरहानपूर येथील डेप्युटी रेंजरने जंगल चौकात गळफास घेऊन केली आत्महत्या)

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील मंडला येथील बिछिया विधानसभेतील मतदानाच्या पूर्व तयारीसाठी निघालेल्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मनीराम कंवारे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मतदानाच्या पूर्व तयारीसाठी कर्मचारी निघाले होते. पंरतु वाटेत त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. केंद्रावर उपस्थित इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु वेळेच्या अभावी त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.

मनीराम आज सकळी प्लॉलिटेन्किक कॉलेजवर मतदानाच्या पूर्व तयारीसाठी पोहचले होते. मनीराम हे प्राध्यापक होते. त्यांना ह्रदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला असं डॉक्टरांनी सांगितले. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर कडक सुरक्षा ठेवली आहे.