DCGI कडून कोविड 19 रूग्णांना Itolizumab इंजेक्शन देण्यास मंजुरी; 'मर्यादित आपत्कालीन स्थिती' मध्ये केला जाऊ शकतो वापर
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: Flickr)

भारताच्या ड्रग रेग्युलेटर संस्थेकडून म्हणजेच Drugs Controller General of India कडून आता कोविड 19 रूग्णांवर Itolizumab इंजेक्शन देण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र हे इंजेक्शन केवळ आपत्कालीन परिस्थितीमध्येच मध्यम ते गंभीर स्वरूपाच्या कोरोना बाधित रूग्णांना श्वसनास त्रास होत असल्यास परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती अधिकार्‍यांनी PTI या वृत्तसंस्थेला दिली आहे. दरम्यान Itolizumab हे औषध Biocon कंपनीचे असून 'सोयरारिस' (psoriasis) या त्वचाविकाराच्या रूग्णांना दिले जाते.

Itolizumab ला मंजुरी देण्यापूर्वी त्याची कोरोनाबाधित रूग्णांवर क्लिनिकल टेस्ट झाली आहे. त्याचे निकाल सकारात्मक आले आहे. दरम्यान या टेस्ट्च्या निकलांचे अहवाल पाहण्यासाठी एम्सचे पल्मोनोलॉजिस्ट, फॉर्माकोलॉजिस्ट अशा तज्ञ मंडळींचा समावेश होता. कोविड 19 च्या रूग्णांमध्ये साइटोकाइन सिंड्रोम (cytokine syndrome) च्या उपचारांसाठी या इंजेक्शनला परवानगी देण्यात आली आहे.

ANI Tweet

भारतामध्ये दिवसागणिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. आज देशात कोरोनाबाधितांचा आकडा 8 लाखांच्या पार गेला आहे. त्यामुळे देशात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी थोस औषध किंवा लस शोधण्याच्या प्रयत्नांनादेखील चालना देण्यात आली आहे. सध्या भारतामध्येही कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी कोविड 19 आजारावर उपचार म्हणून दोन संभाव्य लसींची क्लिनिकल ट्रायलला DCGI कडून परवानगी देण्यात आली आहे.