खेळ, पदक, खेळाडू म्हण्टलं की मनात आदरचं येतो. कुस्ती हा आपला पारंपारिक खेळ. एव्हाना पैलवानांना अक्षरशा डोक्यावर घेवून नाचणं हे आपलं कुस्तीप्ती प्रेम. पण हा पदकावर पदक जिंकणारा पैलवानचं हैवान झाला तर? हो असचं काहीसं गुराजतमध्ये घडलं आहे. गुजरातचा राज्यस्तरीय कुस्तीपटूने कुस्ती या खेळालाचं नाही तर माणुसकीला काळीमा फासणार काम केलं आहे. गुजरात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालणाऱ्या खेळाडून १०० महिलांना विनयभंग केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. तरी हा पैलवान तोंडावर मास्क घालून या प्रकारची कृत्य करायचा असा प्रकार पुढे आला आहे. पोलिसांनी या पैलवानाला गुजरातच्या राजकोट येथून अटक केली आहे. एका योग शिक्षिकेच्या तक्रारी नंतर आरोपीस अटक केली असुन पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर आरोपीने आपला गुन्हा कबुल केला आहे.
एवढचं नाही तर योग शिक्षिका ही एकचं नाही तर यापूर्वी जवळजवळ १०० महिलांचा विनयभंग केल्याची कबूली या आरोपी पैलवानाने दिली आहे. पण त्या महिलांनी घाबरुन तक्रार न केल्याचं आरोपीने सांगितलं. तसेच या पूर्वीही या पैलवानास पोलिसांनी महिलांना रस्त्याने चालतांना कानशिलात लगवल्या प्रकरणी अटक केली होती.याप्रकारची विकृती केल्यास त्याला समाधान मिळत असं त्याने आपल्या जबाबात नमूद केलं आहे. (हे ही वाचा:- Ludhiana Rape Case: दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी Library Restorer वर गुन्हा दाखलhttps://marathi.latestly.com/india/a-case-has-been-filed-against-library-restorer-for-raping-a-class-10-student-422534.html)
योग शिक्षिका आणि पैलवान एकाच पार्कीग क्षेत्रात उभे असताना पैलवानाने स्वतचा पॅन्ट काढत शिक्षिकेकडे बघून अश्लील इशारे केले. त्यानंतर महिला लिफ्टमध्ये गेली पण गुन्हेगाराने लिफ्टमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला तोच या महिला शिक्षिकेने त्याला धक्का मारुन लिफ्ट बाहेर काढण्याचा प्रयत्न केला केला पण गुन्हेगाराने महिलेच्या कानशिलात लगावली. तोच महिलेने आरडाओरडा केला आणि गुन्हेगाराने घटनास्थळावरुन पळ काढला, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने प्रकाशीत केलं होतं. तरी या आरोपी पहिलवानास आता अटक केली असुन पोलिस या प्रकरणाची सखोल चैकशी करत आहेत.