Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

कोविड19 च्या प्रकरणांचा शोध घेण्यासाठी खासगी संस्थेद्वारे संबंधित आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि शासकीय विमानतळावर रॅपिड आरटी-पीसीआर तपासणीच्या किंमतीत फारच तफावत दिसून येत आहे. तर कोझिकोडच्या विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणीची किंमत 1580 रुपये आहे. तर मुंबई आणि हैरदाबादच्या विमानतळावर त्याचे दर दीडपट अधिक 3900 रुपये आहे. दोन्ही विमानतळावर चाचणीच्या किंमतीत ऐवढा मोठा फरक आहे. परंतु राज्य सरकारद्वारे हस्तक्षेप करण्यात आल्यानंतर त्याच्या दरात 13 टक्क्यांनी कपात करण्यात आली. तर चार मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळ- दिल्ली, मुंबई, हैरदाबाद आणि बंगळुरु येथून अधिक लोक प्रवास करतात. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या आकडवारीनुसार, ऑक्टोंबर मध्ये या चार विमानतळावर 12.23 लाख प्रवासी आले. या महिन्यात एकूण 22.2 लाख प्रवासी भारतात आले. तर कोझिकोड मध्ये 1.4 लाख, गोव्यात 9565, कोलकाता मध्ये 34,076 आणि चैन्नईत 1.57 लाख प्रवासी आले.

इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्ट्सनुसार, आरटी-पीसीआर तपासाठी अधिक किंमतीमागील कारण सांगण्यात आले आहे. त्यानुसार एअरपोर्टचे व्यवस्थापन ज्या कंपन्या करतात ते त्यामधील 3035 टक्के हिस्सा महसूलाच्या आधारावर घेत आहेत. परंतु शासकीय विमानतळावर महसूल जमा केला जात नाही आहे. ओमिक्रॉन वेरियंट नंतर केंद्राने प्रभावित देशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. यामध्ये दक्षिण अफ्रिका, चीनसह युरोपीय देशांचा समावेश आहे.(दिल्लीत Omicron Variant चा आढळला दुसरा रुग्ण, झिंबावे वरुन आल्याची माहिती)

हैदराबाद विमानतळावर कोविड-19 च्या RT-PCR चाचणीसाठी 750 रुपये, तर रॅपिड RT-PCR चाचणीची किंमत 3,900 रुपये आहे. रॅपिड आरटी-पीसीआरची किंमत अलीकडेच आधीच्या 4,500 रुपयांवरून कमी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, मुंबईत, रॅपिड आरटी-पीसीआर चाचणीची किंमत 3,900 रुपये आहे, परंतु ती देखील राज्य सरकारच्या हस्तक्षेपानंतर गेल्या आठवड्यात 4,500 रुपयांवरून कमी करण्यात आली. मुंबई विमानतळावर सामान्य RT-PCR ची किंमत 600 रुपये आहे. गेल्या आठवड्यात, महाराष्ट्र सरकारने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून आरटी-पीसीआर चाचणी शुल्क समान असावे असे सांगितले होते.

रिपोर्ट्सनुसार, विमानतळाचे व्यवस्थापन करणार्‍या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सामान्य RT-PCR ची किंमत सरकारद्वारे निश्चित केली जाते, परंतु रॅपिड RT-PCR चाचणीची किंमत क्लिनिकल लॅबद्वारे निश्चित केली जाते. उदाहरणार्थ, दिल्ली विमानतळावर, जेनस्ट्रिंग डायग्नोस्टिक्स चाचण्या घेतात. सूत्रांनी सांगितले की, दिल्ली विमानतळाला नागरी उड्डाण मंत्रालयाने अधिक प्रयोगशाळा सामावून घेण्यास सांगितले आहे. दिल्ली विमानतळ GMR द्वारे चालवले जाते. दिल्ली व्यतिरिक्त, GMR हैदराबादचे आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील चालवते. येथे MapMyGenome नावाची कंपनी तपास करते.