COVID-19 Vaccination in India: कोरोना लसीकरण मोहिमेत 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी 'ऑन साइट रजिस्ट्रेशन'
Vaccination | Representative Image (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्ध चाललेल्या लसीकरणात (Corona Vaccination Campaign) सरकारने सोमवारी (24 मे) आणखी एक महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध करुन दिली. यापुढे आता 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना ऑन साईट रजिस्ट्रेशन (On-Site Registration) करता येणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी आता ऑनसाईट रजिस्ट्रेशन उपलब्ध असेल. त्यामुळे हे लोक आता कोरोना लसीकरण सेंटवर जाऊन ऑफलाईन सुद्धा रजिस्ट्रेशन करु शकतात. कोरोना लसीकरण (COVID-19 Vaccination करताना वाया जाणारे लसीचे प्रमाण थांबविण्यासाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे. याचाच अर्थ असा की कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. परंतू, नोंदणीकृत व्यक्ती कोरोना सेंटरपर्यंत पोहोचू शकला नाही. तर अशा वेळी वाया जाणारी लस प्रत्यक्ष उपस्थित राऊन नोंदणी केलेल्या व्यक्तीला देता येणार आहे.

कोरोना लसीकरणाबाबत नव्या पद्धतीने नोंदणी करण्यासाठी कोविन प्लॅटफॉर्ममध्ये आवश्यक ते बदल केले जात आहेत. दरम्यान, नवी सूविधा सरकारी वॅक्सीनेशन सेंटर्सवर असणार आहे. आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका प्रतिक्रियेत म्हटले आहे की, राज्य आणि आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर या वयोगटातील नागरिकांना ऑन साईट रजिस्ट्रेशन सेवा सुरु करु दिली जाणार आहे. (हेही वाचा, लहान मुलांवर Covaxin च्या ट्रायल्स जून 2021 पासून सुरू होण्याची शक्यता; Bharat Biotech ची माहिती)

प्राप्त माहितीनुसार, ऑनलाईन बुकींग केल्यानंतर दिवसाअखेरीस कोरोना लसीकरणातील काही डोस शिल्लख राहात असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये काही कारणे प्रामुख्याने पुढे आली. यात कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करुनही काही लोक लस घेण्यास उपस्थित राहात नाहीत. अशा वेळी लसीचे डोस मोठ्या प्रमाणावर शिल्लख राहतात. त्यामुळे ऑनसाईट रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध असल्यास शिल्लख राहणारे आणि वाया जाणारी लस वाचवता येऊ शकेल.

कोविन अॅपवर भलेही एकाच मोबाईल नंबरवरुन चार लाभार्थ्यांचे रजिस्ट्रेशन होत आहे. किंवा आरोग्य सेतू किंवा उमंग सारख्या अॅपवरुनही रजिस्ट्रेशन हत आहे. परंतू, अनेक लोक असे आहेत ज्यांन ऑनसाईट रजिस्ट्रेशनची आवश्यकता आहे. काही लोकांकडे इंटरनेट नसते किंवा काहींकडे स्मार्टफोनच नसतो, अशा वेळी काही नागरिकांना लसीकरण नोंदणी करण्यास अडथळा येतो.