भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या मोठ्या वेगाने वाढते आहे. त्यातच ओमायक्रोन (Omicron) या नव्या स्ट्रेनची भर पडल्याने चिंता अधिकच वाढली ( COVID-19 Updates In India) आहे. देशातील 23 राज्यांमध्ये आतापर्यंत आमायक्रोन रुग्ण आढळले आहेत. संपूर्ण देशाचा विचार करता देशभरात ओमायक्रोन संक्रमितांची संख्या 1431 इतकी झाली आहे. त्यापैकी 488 जण उपचार घेऊन बरेही झाले आहेत. ओमायक्रोन रुग्णांची देशातील आकडेवारी पाहता सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात ओमायक्रोनचे 454 रुग्ण आढळले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली आहे. दिल्लीत ओमायक्रोनचे 351 रुग्ण आढळले आहेत.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ओमाक्रोन संक्रमितांची राज्यनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे: तामळनाडू-118, गुजरात-115, केरळ- 109, राजस्थान- 69, तेलंगाना- 62, हरियाणा- 37, कर्नाटक- 34, आंध्र प्रदेश- 17, पश्चिम बंगाल- 17, ओडिशा- 14, मध्य प्रदेश- 9, उत्तर प्रदेश- 8, उत्तराखंड- 4, चंडीगढ- 3, जम्मू-कश्मीर- 3, अंडमान एवं निकोबार- 2, गोवा-1, हिमाचल प्रदेश- 1, लद्दाख-1, मणिपुर-1,पंजाब-1. (हेही वाचा, दिलासादायक! '2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी Covaxin सुरक्षित'- Bharat Biotech चा दावा)
दरम्यान, ओमायक्रोन संक्रमितांची वाढती संख्या पाहता जवळपास सर्वच राज्यांनी आणि केंद्र सरकारनेही सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने कोरोना संक्रमितांची वाढती आकडेवारी विचारात घेऊन निर्बंध लावले आहेत. प्रामुख्याने मुंबईत समुद्र किनारे, खुली मैदाने, उद्याने आणि पार्क आदींसह सार्वजनिक ठिकाणांवर सायंकाळी 5 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत प्रतिबंध लागू केले आहेत. हा आदेश 15 जानेवारीपर्यंत लागू असणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळे भारत सरकारने लसीकरण मोठ्या प्रमाणावर सुरु केले आहे. लहान मुलांनाही असलेला कोरोनाचा धोका विचारात घेता 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांनाही कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. कोविन अॅपच्या माध्यमातून त्यासाठी नोंदणी आजपासून सुरु झाली आहे.