माजी एनएसजी महासंचालक (Former NSG Director General) जेके दत्त (JK Dutt Passes) यांचे निधन (JK Dutt Passes Away) झाले आहे. त्यांना कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाला होता. जे के दत्त यांनी 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याविरोधात ( 26/11 Mumbai Counter-Terror Operation) राबवलेल्या मोहिमेचे नेतृत्वही त्यांनी केले होते. कोरोना व्हायरस (COVID-19) संसर्ग झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते 72 वर्षांचे होते.
जे के दत्ता यांच्या कुटुंबीयांनी वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, माजी आयपीएस अधिकारी जे के दत्ता यांना गुडगाव येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना व्हायरस संसर्गामुळे त्यांच्या शरीरात गुंतागुंत निर्माण झाली होती. 14 एप्रिलपासून त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागली होती.
दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरु असताना हृदयविकाराचा झटका आल्याने आज (बुधवार, 19 मे 2021) दुपारी 3.30 वाजता त्यांचे निधन झाले. दत्त यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, जो नोएडा येथे नोकरी करतो आणि एक मुलगी, जी अमेरिकेत आहे.