Coronavirus: अवघ्या 24 तासात 97,894 जण कोरोना व्हायरस संक्रमित, एकूण रुग्णसंख्या 51 लाखांच्याही पुढे, देशात कोविड 19 चे विदारक चित्र
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या आता 50 लाखांच्याही पार गेली आहे. गेल्या 24 तासात देशभरात तब्बल 97,894 नवे कोरोना व्हायरस संक्रमित आहेत. तर 1,132 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दशातील एकूण कोरोना व्हायरस (Covid 19) संक्रमितांची संख्या 51,18,254 इतकी झाली आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या 10,09,976, उपचार घेऊन बरे झालेल्या आणि रुग्णालयातून सुट्टी मिळालेल्या 40,25,080 आणि मृत्यू झालेल्या 83,198 जणांचाही समावेश आहे.

देशांच्या तुलनेत जर राज्य सरकारांचा विचार करायचा तर महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या सर्वाधिक आहे. शेवटची माहिती हाती आली तेव्हा राज्यात प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 2,97,506 इतकी झाली होती. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 15 लाखांच्या पुढे गेली आहे. तर मृत्यू झालेल्यांची संख्या आतापर्यंत 30,883 इतकी झाली आहे.

महाराष्ट्राच्या खालोखाल दिल्ली राज्याचा क्रमांक लागतो. दिल्ली मध्ये कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 30,914, तर मृतांची संख्या 4,839 इतकी झाली आहे. दिल्लीपाठोपाठ तामिळनाडू प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 46,633 आणि मृतांच्या 8,559 संख्येसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहे. (हेही वाचा, Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 2,352 रुग्णांची नोंद; सध्या 31,678 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु)

असम राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. या राज्यात प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 29,09 इतकी आहे. या राज्यात आतापर्यत 511 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश राज्यात 67,002 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. इथे 4690 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगाल मध्ये 24,147 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 4,123 जणांचा मृत्यू झाला.