Medical workers (Photo Credits: IANS)

मुंबई (Mumbai) मध्ये आज कोरोना विषाणूच्या (Coronavirus) 2,352 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण संक्रमितांची संख्या 1,75,886 वर पोहोचली आहे. आज शहरामध्ये कोरोनाचे तब्बल 1,500 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 1,35,566 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईमधील सक्रीय रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती आता 31,678 वर पोहोचली आहे. आज मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 50 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 8,277 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बीएमसीने (BMC) याबाबत माहिती दिली.

आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 31 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 37 रुग्ण पुरुष व 13 रुग्ण महिला होत्या. यातील 2 जणांथे वय 40 वर्षा खाली होते. 37 जणांचे वय 60 वर्षा वर होते. तर उर्वरित 11 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 77 टक्के झाला आहे. 9 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.28 टक्के होता. 15 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 9,50,112 इतक्या आहेत. सध्या मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर कमी होऊन 55 दिवसांवर आला आहे. (हेही वाचा: 10 रुग्ण कोरोना व्हायरस पॉझिटीव्ह आढळल्यास इमारत सील करणार, मास्क नसल्यास 200 रुपये दंड- मुंबई महापालिका)

पीटीआय ट्वीट -

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, 15 सप्टेंबर नुसार मुंबईमध्ये 601 सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) आहेत, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 8,992 आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 23,365 व 474 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात 17,559 रुग्णांना सोडण्यात आले आहे. यासह राज्यातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 11,21,221 वर गेली असून, त्यात 30,883 मृत्यू आणि 7,92,832 बरे झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. सध्या राज्यात 2,97,125 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांनी याबाबत माहिती दिली.