Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग दिवसागणित मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. देशात मागील 24 तासांत तब्बल 96,551 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,209 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 74% सक्रीय रुग्ण हे कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या 9 राज्यांमध्ये आहेत. तर 48% सक्रीय रुग्ण (Active Cases) हे केवळ 3 राज्यांमध्ये आहेत. यात महाराष्ट्र (Maharashtra), कर्नाटक (Karnataka) आणि आंध्रप्रदेश (Andhra Pradesh) या राज्यांचा समावेश आहे. देशात एकूण 9,43,480 सक्रीय रुग्ण आहेत. त्यापैकी 74% रुग्ण 9 राज्यांमध्ये आहेत तर 48% रुग्ण केवळ महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या 3 राज्यांमध्ये आहेत.

नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्रातून 23,000 हून अधिक रुग्णांची नोंद झाली असून आंध्र प्रदेशात 10,000 हून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात 2,60,000 हून अधिक सक्रीय रुग्ण असून कर्नाटकातील सक्रीय रुग्णांचा आकडा एक लाखाहून अधिक आहे. दरम्यान इतर राज्यांमध्ये केवळ 21.9% सक्रीय रुग्ण आहेत. यात केरळ, दिल्ली, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, गुजरात, राजस्थान, झारखंड, बिहार आणि जम्मू काश्मीर यांचा समावेश आहे. (भारतात गेल्या 29 दिवसात 100% पेक्षा अधिक कोरोनाबाधितांची प्रकृती सुधारली असून डिस्चार्ज दिल्याची आरोग्य मंत्रालयाची माहिती)

ANI Tweet:

मागील 24 तासांत देशात कोरोना संसर्गामुळे 1,209 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्रात 495, कर्नाटकात 126, उत्तर प्रदेशात 94 अशी आकडेवारी आहे. दरम्यान एकूण मृतांपैकी महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यांमधील 69% रुग्ण आहेत. (भारतात गेल्या 24 तासात 96,551 कोरोनासंक्रमितांची नोंद तर 1209 जणांचा बळी; देशातील COVID19 चा आकडा 45 लाखांच्या पार)

दरम्यान, देशातील कोरोना बाधितांचा आकडा 4,56,2415 वर पोहचला आहे. त्यापैकी 3,54,2664 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. परंतु, दिवसागणित पडणारी मोठी भर चिंताजनक आहे.