Coronavirus in India: भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 33,87,501 वर; 77,266 नव्या रुग्णांची उच्चांकी वाढ
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतात दिवसागणित कोरोना बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील 24 तासांत 77,266 नव्या रुग्णांची मोठी भर पडली आहे. तर 1,057 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या भरीमुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 33,87,501 वर पोहचला आहे. तर एकूण 61,529 मृतांची नोंद झाली आहे. सध्या देशात 7,42,023 सक्रीय रुग्ण (Active Cases) असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर 25,83,948 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry) देण्यात आली आहे.

कोरोना संसर्गामुळे बिकट झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी टेस्ट, ट्रॅक, ट्रिट (Test-Track-Treat) या त्रिसुत्रीचा वापर केंद्र सरकारकडून करण्यात आला. या त्रिसुत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गेल्या 5 महिन्यात 3/4 पेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1/4 पेक्षा कमी अॅक्टीव्ह रुग्ण सध्या देशात आहेत, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. (Covid-19 Recoveries: गेल्या 5 महिन्यात 3/4 पेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त: आरोग्य मंत्रालय)

ANI Tweet:

कोरोना व्हायरसचे संकट गेल्या 5 महिन्यांपेक्षा अधिक काळ देशावर घोंगावत आहे. त्याचबरोबर जगभरातील अनेक देश कोविड-19 संसर्गामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे कोरोनावरील लसीच्या विकासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान जगभरातील अनेक कोरोना लसी ट्रायलच्या विविध टप्प्यात असून या वर्षाअखेरपर्यंत लस उपलब्ध होईल, असे संकेत मिळू लागले आहेत.