Representational Image (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता आता राज्य सरकारकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान आता मुंबई- पुणे मार्गासह राज्यातील काही लांबपल्ल्याच्या गाड्या पुढील काही दिवसांसाठी रद्द करण्याचा निर्णय मध्ये रेल्वेने जाहीर केल्यानंतर आता कोकण रेल्वे मार्गावरदेखील काही गाड्यांच्या फेर्‍या कमी केल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे. यामध्ये 10215-10216 या मडगाव - एर्नाकुलम अप आणि डाऊन मार्गावरील गाड्या आहेत. तर यासोबतच परनेम - मडगाव या डेमू गाडीच्या अप आणि डाऊन गाड्यांचा समावेश आहे. अद्याप मुंबई, पुण्यातून गोवा किंवा कोकणात जाणार्‍या कोणत्याही गाडीचा समावेश करण्यात आलेला नाही. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधताना अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन नागरिकांना कळताना हे व्हायरस विरूद्धचं युद्ध जिद्दीने जिंकायला साथ द्या असे म्हणाले आहेत. Coronavirus Scare: गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने रद्द केल्या 10 गाड्यांच्या 35 फेऱ्या; जाणून घ्या संपूर्ण यादी

दरम्यान मध्य रेल्वेने यापूर्वी डेक्कन एक्स्प्रेस सह मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ या ठिकाणी जाणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत. त्यापाठोपाठ मुंबई- पुणे मार्गावर धावणार्‍या एसटी महामंडळाच्या गाड्या देखील 50% प्रवाशांसहच चालू ठेवल्या जाणार आहेत.

कोकण मार्गावरील स्थगित करण्यात आलेल्या गाड्या

Coronavirus : कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ ;जाणून घ्या आतापर्यंत कोणत्या राज्यात किती रुग्ण : Watch Video 

देशात कोरोनाबाधितांचा आकडा 170 पर्यंत पोहचला असून सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्र राज्यात 49 आहेत. यामध्ये मुंबईच्या कस्तुरबा रूग्णालयात दोघा जणांना व्हेटींलेटर वर ठेवण्यात आले आहे. आज रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीयांशी संवाद साधणार आहेत.