राम मंदिरावर काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचे वादग्रस्त विधान (Video)
Mani Shankar Aiyar (Photo Credit: ANI)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर (Manishankar Aiyar) यांनी राम मंदिरावर पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. "राजा दशरथ यांच्या महालात 10 हजार खोल्या होत्या. त्यामुळे श्रीराम नेमके कोणत्या खोलीत जन्माला आले काय ठाऊक?" असे विधान त्यांनी केले आहे. दिल्लीतील सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त विधान केले. राम मंदिर मुद्द्यावर भाजप हायकमांड निरुत्तर, पक्षात अस्वस्थता; चिंतन, सहमती, संयममाची भाषा : शिवसेना

तुम्हाला हवे असल्यास मंदिर नक्की बांधा. पण दशरथ मोठे राजा होते. त्यांच्या महालात 10 हजार खोल्या होत्या. त्यामुळे श्रीरामांचा जन्म कोठे झाला हे कसे सांगता येईल. रामाचा जन्म त्या ठिकाणी झाला असा आपला समज असल्याने त्या ठिकाणी राम मंदिर उभारायचं ठरवलं. पण तिथेच राम मंदिर बांधणार, याचा काय अर्थ आहे? राममंदिरासाठी  मशीद उद्धवस्त करण्यात आलं, असेही ते म्हणाले. पण अल्लावर विश्वास ठेवणे हिंदुस्थानी लोकांसाठी चुकीचे आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आपल्या या वादग्रस्त विधानामुळे मणिशंकर अय्यर सोशल मीडियात चांगलेच ट्रोल झाले.