Sonia Gandhi | Photo Credits: Twitter

दिल्लीमध्ये मागील 3 दिवसांपासून उफाळलेल्या हिंसाचारानंतर आज कॉंग्रेस पक्षाने आपली पत्रकार परिषद घेत या हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारत अमित शहा यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. दरम्यान दिल्लीतील हिंसाचार हा चिंतेचा विषय असून त्यावर केंद्रावर जाणीवपूर्वक 72 तास कोणतीच कारवाई केली नसल्याचं म्हटलं आहे. सोबतच भाजपा नेत्याच्या भडकाऊ भाषणामुळे हा हिंसाचार पेटला असल्याचा संशय सोनिया गांधी यांनी व्यक्त केला आहे.

सोनिया गांधी प्रमाणेच प्रियंका गांधी यांनी देखील दिल्लीवासीयांनी शांतता प्रस्थापित करण्याला मदत करावी असं म्हटलं आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कुठे होते ? असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. हिंसाचार वाढल्यानंतर निमलष्करी दलांना का पाचारण केले नाही? हा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. सोबतच दिल्लीमध्ये अतिरिक्त सुरक्षा पथके तात्काळ तैनात करण्याची, प्रत्येक जिल्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना तैनात करण्याची मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. Delhi Violence: NSA अजीत डोभाल यांना दिल्ली हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्याची जबाबदारी, सरकारचा निर्णय.  

मागील तीन दिवसातील दिल्ली हिंसाचारामध्ये 20 जणांचा बळी गेला आहे तर 170 हून अधिक जखमी दिल्लीच्या जीटीबी रूग्णालयात दाखल करण्यात आली आहेत. यावेळेस दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.