Lok Sabha Election 2024: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल
JP Nadda

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, सोशल मीडिया प्रमुख अमित मालवीय आणि कर्नाटक भाजपचे अध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र विरुद्ध कर्नाटक काँग्रेसने गुन्हा दाखल केला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लोकांना धमकावण्यासाठी भाजपने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप करत काँग्रेसने भाजपविरोधात एफआयआर दाखल केला आहे.  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर कर्नाटक भाजपने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यावरून आता मोठा वाद झाला आहे. या व्हिडिओबाबत काँग्रेसने आरोप केला होता की, या व्हिडिओमध्ये राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राहुल गांधी यांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. (हेही वाचा - Rajan Vichare on Eknath Shinde: 'तुमच्यासारखा गद्दार नाही, मला बोलायला लावू नका', उद्धव ठाकरे यांचे 'ठाणे'दार राजन विचारे एकनाथ शिंदे यांच्यावर बरसले)

यासंदर्भात कर्नाटक काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्रही लिहिले होते. ज्यामध्ये कर्नाटक भाजपने शेअर केलेल्या या कथित व्हिडिओद्वारे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना धमकावल्याचे सांगण्यात आले होते. एससी/एसटी समाजातील लोकांमध्ये शत्रुत्व, द्वेष आणि दुर्भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ भाजपने पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कर्नाटक काँग्रेसचे मीडिया आणि कम्युनिकेशन विभागाचे अध्यक्ष रमेश बाबू म्हणाले की, भाजपने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गांना आरक्षणाच्या टोपलीत अंडी दाखवण्यात आली आहेत. या व्हिडिओमध्ये ॲनिमेटेड स्वरूपात राहुल गांधी यांना मुस्लिम समाजाचे आणखी एक अंडे आरक्षणाच्या टोपलीत टाकताना दाखवण्यात आलं आहे. टोपलीत तीन अंडी असताना तीनही फुटतात आणि मुस्लिम समाजाची अंडी मोठी होताना, यात दाखवण्यात आलं आहे.