मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM (Uddhav Thackeray) यांनी ''माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेणार नाही. त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये तडजोड होणार नाही. अशा नराधमांना वचक बसवा'' असे उद्गार महिला व बालकांच्या सुरक्षेकरता आयोजित गृहविभागाच्या आढावा बैठकीत काढले. साकीनाका बलात्कार प्रकरण (Mumbai Sakinaka Rape Case) मुंबईसह महाराष्ट्राला हादरवून टाकणारे ठरले. त्यानंतर महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. या सर्व टीकेनंतर राज्य सरकार अधिक गंभीर झाले आहे. या वेळी उद्धव ठाकरे यांनी परप्रांतीय नागरिकांची नोंद ठेवण्याचे निर्देशही दिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही काळापूस्वी अशीच मागणी राज्य सरकारकडे केली होती. राजयांची मागणी राज्य सरकारने एकप्रकारे मान्य केली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
• इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल. ते येतात कुठून जातात कुठे यांची माहिती ठेवावी लागेल.
• जलदगती न्यायालयांतून निकाल लागतो. पण शिक्षेच्या अंमलबजावणीबाबत आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेबाबत सुधारणा करण्याचे प्रयत्न व्हावेत.
• शक्ती कायद्यातही सुधारणा करण्यावर भर दिला जाईल
• महिला पोलीसांनी पीडीत महिलांशी विश्वासाने बोलून माहिती घ्यावी. त्यांच्या छोट्या तक्रारींकडेही दुर्लक्ष होऊ नये (हेही वाचा, Sakinaka Rape Case: महिला सुरक्षेबाबत नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले महत्वाचे सल्ले)
ट्विट
माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेणार नाही. त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये तडजोड होणार नाही. अशा नराधमांना वचक बसवा, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला व बालकांच्या सुरक्षेकरता आयोजित गृहविभागाच्या आढावा बैठकीत म्हणाले. pic.twitter.com/te8jCrEGan
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 13, 2021
दरम्यन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात जाहीर व्यासपीठावरुन बोलताना राज्य सरकारला सूचनावजा अवाहन केले होते. या अवाहनात त्यांनी म्हटले होते की, 'राज्यात कुठून परप्रांतीय येतात, कुठे जातात, कुठे राहतात, याची कसलीही नोंद नाही. ती नोंद राहिली पाहिजे, परप्रांतीयांच्या बाबतीची माहिती ही स्थानिक पोलीस स्टेशनकडे पर्यायाने राज्य सरकारकडे असली पाहिजे'.
ट्विट
• इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल. ते येतात कुठून जातात कुठे यांची माहिती ठेवावी लागेल.
• जलदगती न्यायालयांतून निकाल लागतो. पण शिक्षेच्या अंमलबजावणीबाबत आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेबाबत सुधारणा करण्याचे प्रयत्न व्हावेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 13, 2021
काय आहे प्रकरण?
मुंबई येथील साकिनाका येथे एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाला. या प्रकरणतील पीडितेचा मुंबई येथील राजावाडी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपीने बलात्कार केल्यानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी रॉड टाकले होते. त्यामळे महिलेची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली होती. तिच्यावर होणाऱ्या कोणत्याच उपचाराला तिचे शरीर प्रतिसाद देत नव्हते. तरीही डॉक्टरांचे एक पथक तिचे प्राण वाचविण्यासाठी शर्थिचे प्रयत्न करत होते. या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर तिच्या मृत्यूची बातमी आली. पीडितेवर बलात्कार झाल्याची घटना 10 सप्टेंबरला पुढे आली होती. मुबईतील साकिनाका येथील खैरानी रोड परिसरात ही घटना गुरुवारी मध्यरात्री (9 सप्टेंबरला) घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी वातावरण ढवळून निघाले.