Sakinaka Rape Case: महिला सुरक्षेबाबत नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले महत्वाचे सल्ले
नीलम गोऱ्हे (Photo credit : youtube)

साकीनाका बलात्कार आणि हत्याप्रकरणी ( संपूर्ण महाराष्ट्रातून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या घटनेनंतर राज्यातील अनेक नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. यातच महिला सुरक्षेबाबत महत्वाच्या उपाय योजना करण्याच्या अनुषंगाने नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महत्वाचे सल्ले दिले आहेत. त्यानुसार, रेल्वे पोलीस, राज्य पोलीस दल यांना सीसीटीव्ही संख्या वाढविणे आणि ऑनलाईन देखरेख कार्यक्षम करून गुन्हे ताबडतोब रोखणे, महिलांच्या तक्रारी लवकर समजून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप करणे, तसेच सामाजिक संघटनांचा पोलीसांच्या तपासात, पिडीतांच्या समुपदेशनात सहभाग वाढविणे, अशा सूचनांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात लॉकडाउन कालावधीत कौंटुबिक हिंसाचार आणि नेत्रहीन महिलांवरील अत्याचारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर निर्बंध कमी झाल्यावर सार्वजनिक ठिकाणी बलात्कार, अपहरण, सायबरक्राईम, यांचे प्रमाण वाढल्याचे समजत आहे. हे देखील वाचा- Sakinaka Rape Case: साकीनाका घटनेचा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यात येईल, गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलांनी दिले स्पष्टीकरण

डॉ. नीलम गोऱ्हे यांचे महत्वाचे सल्ले-

- मुंबईतील लोकल मधील महिलांना होणाऱ्या त्रास बाबत सीसीटीव्ही संख्या वाढविणे, गस्ती वाढविणे, वारंवार घटना घडणाऱ्या ठिकाणी लाईट लावणे, सीसीटीव्ही लावणे, टोल फ्री क्रमांकाचा प्रभावी वापर करणे.

- महिलांना कामाचे स्वरूप,समितीचे अधिकार व कर्तव्ये समजावीत म्हणून प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. याबाबत पोलीस प्रशासनास आवश्यक सूचना निर्गमित कराव्यात.

- पॉक्सो कायद्याअंतर्गत प्रलंबित केसेस तात्काळ निकाली काढण्यासाठी फिरती फास्टट्रॅक न्यायालये व फिरती न्यायालये कार्यान्वित करण्यात यावीत.

- बलात्कार पीडित महिलांना किंवा बालकाला मनोधैर्य योजनेंतर्गत सात दिवसात मदत मिळावी, यासाठी संबंधित विधी व न्याय विभागाला आदेश करावे.

मुंबईच्या साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार करुन आरोपीने पीडिताच्या गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानुष प्रकार घडला आहे. त्यानंतर पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पीडित महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, आज उपचारदरम्यान पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.