Christian Michel (Photo Credit: ANI)

ऑगस्टा वेस्टलँड (Agustawestland) हेलिकॉप्टर व्यवहारातील मध्यस्थ आणि कंत्राटासाठी लाच घेतल्याचा आरोप असलेला ब्रिटीश नागरिक क्रिश्चियन मिशेल ( Christian Michel) याला आज पाच दिवसांची सीबीआय (CBI) कोठडी सुनावण्यात आली आहे. पाटियाला हाऊस न्यायालयात आज क्रिश्चियन मिशेलला सादर करण्यात आले होते. न्यायालयात सीबीआयकडून विशेष सरकारी वकील डी पी सिंह तर आरोपीचे वकील एल्जो जोसेफ हजर  होते.

सीबीआयने अधिक तपासणीसाठी मिशेल यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती . मिशेलकडून महत्वपूर्ण कागदपत्रांबाबत माहिती काढून घेण्यासाठी सीबीआय कोठडी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.

ऑगस्टा वेस्टलँड (Agusta westland) हेलिकॉप्टर व्यवहारात क्रिश्चियन मिशेल ( Christian Michel) ने 225 कोटीची लाच स्वीकारल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणी अधिक तपासणी करता यावी याकरिता भारत सरकारने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. आज पहाटे क्रिश्चियन मिशेल ( Christian Michel) भारतात आला. ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: प्रमुख आरोपी क्रिश्चियन मिशेल भारताच्या ताब्यात

ऑगस्टा वेस्टलँड (Agusta westland) हेलिकॉप्टर व्यवहार काय आहे प्रकरण ?

देशातील काही अति महत्त्वाच्या लोकांसाठी इटलीतील फिनमेकानिका कंपनीच्या ब्रिटिश उपकंपनी असलेल्या ऑगस्टा वेस्टलँड  ची 12 हेलीकॉप्टर्स खरेदी करण्याचा करार तत्कालीन युपीए सरकारने केला होता. मात्र या करारात लाच स्वरूपात काही रक्कम घेऊन भारतातील काही वरिष्ठ पदावरील लोकांना देण्यात आल्याचाही आरोप आहे. हा खरेदी व्यवहार 1 जानेवारी 2014 रोजी रद्द करण्यात आला आहे.