अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर चीनबाबत आणखी एक बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी हिंदी महासागर क्षेत्रात (IOR) दाखल झालेले चीनचे चीनी वैज्ञानिक संशोधन जहाज अर्थात 'हेरवाहू जहाज' यांग वांग-5 (Yang Wang-5) आता या प्रदेशातून निघून गेले आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, भारतीय नौदलाच्या सूत्रांनी मंगळवारी (13 डिसेंबर) सांगितले की, भारतीय नौदल चिनी बॅलेस्टिक मिसाईल आणि सॅटेलाइट ट्रॅकिंग जहाजाच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे.

चीनचे गुप्तहेर जहाज युआन वांग-5 हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि सॅटेलाइट ट्रॅकिंग उपकरणांनी सुसज्ज असल्याचे मानले जाते. या जहाजाच्या हेरगिरीच्या कारवायांवर भारताने चिंता व्यक्त केली आहे. पीटीआयने 6 डिसेंबर रोजी युआन वांग-5 ने आयओआरमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त दिले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)