छत्तीसगडचे (Chhattisgarh) उपमुख्यमंत्री अरुण साओ (Arun Sao) यांचा 20 वर्षीय भाचा कबीरधाम (Kabirdham) जिल्ह्यातील धबधब्यात (Waterfall Accident) बुडाल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. कबीरधामचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार साहू (Tushar Sahu) हा तरुण बोदला पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राणी दहरा धबधब्यात रविवारी संध्याकाळी मित्रांसोबत फिरत असताना बुडाला (Drowning). शेजारच्या बेमेटारा जिल्ह्यातील बेमेटारा शहरातील रहिवासी असलेला तुषार हा उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणीचा मुलगा होता, असे पोलिसांनी सांगितले.
प्राथमिक माहितीनुसार, धबधबा पाहताना तुषार पाण्यात शिरला आणि खोल गेला. त्याला बाहेर निघता आले नाही. पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले आणि त्याला शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू केली. सोमवारी सकाळी पाणबुड्यांनी तुषारचा मृतदेह शोधला आणि बाहेर काढला. जो पाण्यात खडकाखाली अडकला होता. प्राथमिक तपासात बुडून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी, पुढील तपास सुरू आहे. शेजारच्या बेमेटारा जिल्ह्यातील बेमेटारा शहरातील रहिवासी असलेला तुषार हा छत्तीसगडच्या उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणीचा मुलगा होता, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांचा भाचा बुडाल्याची माहिती मिळताच, स्थानिक पोलीस, रहिवासी आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांचा समावेश असलेल्या यांच्याकडून जोरदार शोधमोहीम आणि बचावकार्य सुरु करण्यात आले. संपूर्ण रात्रभर शोधमोहीम सुरुच होती. सर्वांना तुषार जीवंत सापडेल अशी आशा होती मात्र त्याचा मृतदेह सापडला. (हेही वाचा, Shocking: सोशल मिडिया इंफ्लुएंसर Aanvi Kamdar चा मृत्यू; रायगडमधील धबधब्यावर इंस्टाग्राम रीलचे शूटिंग करत असताना पडली दरीत)
पोलिस अधीक्षक डॉ. अभिषेक पल्लव यांनी या घटनेला दुजोरा देताना सांगितले की, तुषार साहू मित्रांसोबत पोहत असताना खोल पाण्यात गेला आणि बुडाला. मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी शोक व्यक्त करताना म्हटले आहे की, “राणी दहारा धबधब्यावर तुषार साहूचा बुडून मृत्यू होणे अत्यंत दुःखद आहे. या दु:खाच्या काळात आम्ही शोकाकुल कुटुंबासोबत आहोत. कावर्धा जिल्हा मुख्यालयापासून अंदाजे 50 किलोमीटर अंतरावर असलेला राणी दहारा धबधबा हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या धबधब्यावर वर्षानुवर्षे अनेक अपघात झाले आहेत, वाढीव सुरक्षा उपायांची तातडीची गरज अधोरेखित केली आहे.