Nand Kumar Baghel Arrested: छत्तीसडच्या मुख्यमंत्र्यांचे वडील नंद कुमार बघेल यांना अटक
Nand Kumar Baghel | (Photo Credits-ANI)

छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Chhattisgarh CM Bhupesh Kumar Baghel's Father Arrested) यांचे वडील नंदकुमार बघेल (Nand Kumar Baghel) यांना पोलिसांनी अटक केली आहे. ब्राह्मण समाजावरुन केलेल्या वादग्रस्त विधानावरुन नंदकुमार बघेल यांना अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर त्यांना रायपूर येथील एका न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालय काय आदेश देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नंदकुमार बघेल यांच्या वक्तव्यावर त्यांचे पुत्र असलेल्या मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Kumar Baghel) यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या विधानाची सत्यता पाहून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे भूपेश बघेल यांनी या आधीच स्पष्ट केले होते.

नंदकुमार बघेल यांच्यावर छत्तीसगढ पोलिसांनी एफआयआर दाखल केली होती. मुख्यमंत्री बघेल यांच्या वडीलंनी म्हणजेच नंदकुमार बघेल यांनी कथित रित्या ब्राह्मण समाजाबाबत आक्षेपार्ह उद्गार काढले होते. (हेही वाचा, Chhattisgarh: तरुणाला थोबाडीत मारणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याच्या विरोधात कारवाई, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निर्देशनावरुन पदावरुन हटवले)

ट्विट

लखनऊ येथे बोलताना नंदकुमार बघेल यांनी म्हटले होते की, 'ब्राह्मण हे विदेशी आहेत. त्यांनी इथे राहणे योग्य नाही. मी भारतातील सर्व गावकऱ्यांना अवाहन करतो की, त्यांनी आपल्या गावांमध्ये ब्राह्मणांना प्रवेश देऊ नये. तसेच मी सर्व समूदयाच्या नागरिकांशी चर्चा करेन की त्यांनी ब्राह्मणांवर बहिष्कार टाकावा.'मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी त्यांच्या वडीलांवर गुन्हा दाखल होताच म्हटले होते की, काँग्रेस सरकारमध्ये कोणीही कायद्यापेक्षा मोठा असत नाही. मग ते मुख्यमंत्र्यांचे 86 वर्षांचे वडील असले तरीसुद्धा. भूपेश बघेल यांनी म्हटले होते. पोलीस कायद्यानुसार कारवाई करतील. आमच्यासाठी कायदा सर्वोच्च आहे.