
Chaturmas 2022 Dos and Don’ts: आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीपासून चातुर्मास [Chaturmas 2022 ] सुरू होतो. या वर्षी रविवारी, 10 जुलैपासून चातुर्मास सुरु होत आहे. आषाढ महिन्यातील एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू ४ महिने निद्रामध्ये जातात. अशी धारणा आहे. चातुर्मासात तपस्या, साधना (ध्यान) आणि उपवासधरणे शुभ मानले जाते. आषाढ शुक्ल एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो आणि कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीपर्यंत चालतो. चातुर्मास देवशयनी एकादशीला सुरू होतो आणि देवोत्थान एकादशीला संपतो. श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक हे चार महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास असे म्हणतात. संत चातुर्मासात प्रवास करत नाहीत आणि त्यांच्या आश्रमात किंवा मंदिरात उपवास आणि साधना करतात. [हे देखील वाचा:- Gatari Amavasya 2022 Date in Maharashtra: गटारी अमावस्येची तारीख आणि का साजरी केली जाते, जाणून घ्या]
चातुर्मासात 'मांगलिक' कार्यक्रम करू नये
चातुर्मासात 'मांगलिक' कार्यक्रम जसे की विवाह, मुंडन, जनेउ संस्कार, विवाह, गृहप्रवेश आणि नामकरण चातुर्मासात करत नाही. कारण ही सर्व कामे शुभ मुहूर्त आणि तिथीनुसार केली जातात. परंतु भगवान विष्णू निद्रावस्थेत गेल्याने या काळात कोणतेही शुभ कार्य करत नाही. धर्मग्रंथात असे सांगितले आहे की, प्रत्येक शुभ कार्यक्रमात भगवान विष्णूसह सर्व देवी-देवतांचे आवाहन केले जाते.
चातुर्मासमध्ये काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या
- चातुर्मासात उपवास, ध्यान, जप, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान आणि पानावर भोजन करणे हे विशेष फलदायी मानले जाते.या महिन्यात धार्मिक विधी केल्यास आणि भगवान नारायणाची कृपा प्राप्त झाल्यास विशेष वरदान प्राप्त होते.
- चातुर्मासात काही लोक राजसिक व तामसिक भोजनाचा त्याग करतात. यावेळी ब्रह्मचर्याचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो.
- चातुर्मासाच्या काळात भगवान विष्णू, माता लक्ष्मी, भगवान शिव आणि माता पार्वती, श्री कृष्ण, राधा आणि रुक्मिणीजी, पितृदेव आणि भगवान गणेश यांची पूजा करावी. त्याचबरोबर सत्संग करणे फायदेशीर आहे.
- चातुर्मासात दान करणे विशेषतः फलदायी मानले जाते कारण ते जीवन, संरक्षण आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान किंवा तर्पण करणे उत्तम असते. यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते.
- चातुर्मासात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई असली तरी या चार महिन्यांत केस आणि दाढी कापू नयेत आणि काळे-निळे कपडे घालू नयेत.
- चातुर्मासात प्रवास करणे देखील टाळावे आणि अनैतिक कृत्यांपासून दूर राहावे.
- चातुर्मासात तेलाने बनवलेल्या वस्तूंपासून दूर राहा. यासोबतच दूध, साखर, वांगी, पालेभाज्या, खारट, गोड, सुपारी, तामसिक अन्न, दही, तेल, लिंबू, मिरची, डाळिंब, नारळ, उडीद, हरभरा डाळ यांचाही त्याग करावा.
- श्रावण सारख चातुर्मासाच्या चार महिन्यांत पालेभाज्या जसे पालक व हिरव्या भाज्या, भाद्रपदात दही, आश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात कांदा, लसूण, उडीद डाळ इत्यादींचा त्याग करावा.
- कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी श्री हरी आणि इतर देवतांच्या विवाहानंतर सर्व शुभ कार्ये करता येतात.