Rahul Gandhi | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Rahul Gandhi On Census: महिला आरक्षण विधेयक (Women's Reservation Bill) संसदेमध्ये सर्वपक्षीय संमतीने मंजूर झाले. त्यानंतर एक दिवसानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत विधेयकातील त्रुटींवर भाष्य केले. अर्थात त्यांनी लोकसभेतही याबाबत भूमिका व्यक्त केली होती. दरम्यान, शुक्रवारी (22 सप्टेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले विधेयक चांगले आहे. त्याला काँग्रेसचा पाठिंबाच आहे. मात्र, या निमित्ताने काही गोष्टी प्रकर्षाने पुढे येतात. त्याचा समावेश विधेयकात व्हायला हवा. जसे की, जातनिहाय जनगणना करुन त्या प्रमाणात महिलांना आरक्षण देण्यात यावे. तसेच, त्याची अंमलबजावणी तातडीने करावी. या दोन्ही गोष्टी तत्काळ होण्यासारख्या आहेत. परंतू, त्या केव्हा होतील हे सरकारच सांगू शकते.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले, महिला आरक्षण ही चांगली गोष्ट आहे. पण आम्हाला त्यात दोन तळटीप सापडल्या. त्यापैकी एक म्हणजे विधेयकाच्या अंमलबजावणीपूर्वी जनगणना करावी लागेल. दुसरी म्हणजे अंमलबजावणी. कारण विधेयक मंजूर झाले पण त्याची अंमलबजावणी केव्हा होणार याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे अंमलबजावणी होण्यासाठी अनेक वर्षे लागतील. अर्थात हे खरे आहे की 33 टक्के आरक्षण आज संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना संधी दिली जाऊ शकते. ही काही गुंतागुंतीची बाब नाही, असेही ते पुढे म्हणाले.

व्हिडिओ

महिला विधेयक लागू केव्हा होणार? हा संबंध देशाला पडलेला प्रश्न आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी 10 वर्षेही लागू शकतात. त्यातच त्याची अंमलबजावणी होणार की नाही याबाबतही कोणाला काहीही माहिती नाही. त्यामुळे सरकार केवळ लोकांचे लक्ष विचलीत करण्याचे काम करत आहे. ठोस असे काहीहीह सांगत नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.