Barkar River | (PC- Twitter)

प्रवाशांनी खचाखच भरललेली बस नदीत उलटून झालेल्या आपघातात तीन ठार तर 15 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना झारखंड (Jharkhand) राज्यातील गिरीडीह (Giridih) येथे घडली. ही बस बरकर नदीत (Barkar River) कोसळली. जिल्हा प्रशासनानेह घटनेची पुष्टी केली असून मदत आणि बचावकार्य सुरु असल्याचे म्हटले आहे. गिरिडीहचे उपायुक्त नमन प्रियेश यांनी वृत्तसंस्था ANI शी बोलताना सांगितले की, अपघातस्थळी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.

एएनआयने मदत आणि बचाव कार्याचा व्हिडिओ ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओत पाहायला मिळते की, एक बस नदीत कोसळली आहे. बहुदा ही घटना पहाटेच्या अंधारात घडली असावी. त्यामुळे सर्व लोक मोबाईल टॉर्च सुरु करुन अपघातग्रस्तांना बसबाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. (हेही वाचा, Rajasthan: राजस्थानमध्ये व-हाडाची बस नदीत कोसळली; 25 जणांचा मृत्यू, मदतकार्य सुरु)

ट्विट

गिरिडीहचे डीसी नमन प्रियेश यांनी सांगितले की, "या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत.  तत्पूर्वी, सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी माहिती दिली की बस रांचीहून गिरिडीहला जात असताना अपघात झाला.

ट्विट

झारखंड राज्याचे आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री बन्ना गुप्ता म्हणाले की, प्रशासनाला अपघाताची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी बचाव कार्य सुरू केले. गिरिडीहमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने बचाव मोहीम सुरू केली आहे. गिरिडीहच्या उपायुक्तांना बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जखमींना सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातील." प्रवाशांची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी सरकार आवश्यक ती कार्यवाही करत आहे, असेही ते म्हणाले.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी हिंदीत ट्विट केले की, "रांचीहून गिरिडीहला जाणारी बस बाराकर नदीत पडल्याची दुःखद बातमी मिळाली. जिल्हा प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे आणि JMM नेते आणि कार्यकर्तेही या प्रयत्नात हातभार लावत आहेत.