
राजस्थान (Rajasthan) राज्यातील उदयपूर (Udaipur) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका तरुणाने चक्क म्हैशीवर बलात्कार (Buffalo Raped) केला आहे. विकृत आणि तितकीच घृणास्पद अशी ही घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे. घटनेचा व्हिडिओ पुढे येताच अनैसर्गिक संभोग (Unnatural Sex) केले प्रकरणी अॅनिमल अँड सोसायटीने उदयपूर येथील प्रतापनगर पोलीस ठाणयात तक्रार दाखल केली आहे. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सोसायटीकडून घटनेचा व्हिडिओही मिळवला असून, पोलीसांनी आरोपीचा शोध घेत आहे.
एनिमल अँड सोसायटीने पशू क्रूरता निवारण अधिकारी दीनदयाल गोरा यांच्याशी बोलताना सांगितले की, रविवारी प्राणीमित्र चिराग नावाच्या यूवकाचा फोन आला. त्याने सांगितले की, गारियो महोल्ला येथील सुंदरवास येथील सीसीटीव्हीमध्ये एक दृश्य पाहायला मिळत आहे. या दृश्यात एक तरुन म्हैशीसोबत अनैसर्गिक संभोग करताना दिसतो आहे. प्राणीमित्राने या घटनेचा व्हिडिओही उपलब्ध करुन दिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर सोसायटी सचिव नेहा बनियाल, संस्थापक क्लेयर अब्राहिम यांच्या निर्देशानुसार प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दिली आहे. (हेही वाचा, धक्कादायक! ठाण्यात 40 वर्षांच्या व्यक्तीने केला कुत्रीवर बलात्कार; पोलिसांकडून गुन्हा दाखल)
दरम्यान, प्रतापनगर पोलीस ठाण्यात पशू क्रुरता अधिनियम 1960 कायदा कलम 11 (1) (a) आणि आयपीसी कायदा 377,511 अन्वये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. प्रताप नगर पोलीस ठाण्यातील मांगीलाल सब इन्सपेक्टर प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रावजी येथील हाटा येथे कुत्र्यावर बलात्कार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तो सध्या कारागृहात आहे. कुत्र्यावर बलात्कार झाल्याच्या घटना यापूर्वीही अनेक वेळा घडल्या आहेत. पोलिसांनी तातीडीने दखल घेऊन दोषींवर कारवाई सुद्धा केली आहे. दरम्यान, म्हैशिवर बलात्कार झाल्याची घटना अलिकडी काही दिवसांमध्ये पहिल्यांदाच घडल्याचे बोलले जात आहे.