Budget 2019 मध्ये जाहीर केलेल्या 'पंतप्रधान किसान सन्मान योजने'चा आजपासून शुभारंभ; एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार लाभ
Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

अर्थसंकल्प 2019 मध्ये जाहीर केलेल्या किसान सन्मान निधी योजनेचा आजपासून (24/2/2019) पासून शुभारंभ होणार आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर पासून या योजनेला सुरुवात होईल. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात तब्बल एक कोटीहून शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतील. तर पुढील दोन-तीन दिवसांत आणखी एक कोटी शेतकऱ्यांना निधीचा हप्ता मिळेल, अशी माहिती केंद्रीय कृषी खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

किसान सन्मान योजने अंतर्गत दोन हेक्टर किंवा त्याहून कमी लागवड योग्य जमीन असलेल्या देशभरातील 12 कोटी शेतकऱ्यांना दर वर्षी 6000 रुपयांचा निधी दिला जाणार आहे. ही रक्कम तीन टप्प्यांमध्ये दिली जाईल. मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील काही महत्वाच्या घोषणा; शेतकरी, नोकरदारांना दिलासा

उत्तर प्रदेश, कर्नाटकसह 14 राज्यातील शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आज पहिला हप्ता मिळणार आहे.