BRICS: नव्या अर्थव्यवस्थेसाठी ब्रिक्स एक अवाज- पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Narendra Modi (Photo Credits: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी गुरुवारी ब्रिक्स (BRICS) परिषदेचे अध्यक्ष पद भूषवले. आपल्या अध्यक्षीय भाषणात पंतप्रधान मोदी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पंतप्रधान म्हणाले, ब्रिक्सच्या या 15व्या वर्धापन दिनी अध्यक्षपद भूषविण्याची संधी भारताला मिळते आहे ही एक मोठी आणि महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. या परिषदेत आमच्याकडे एक तपशीलवार अजेंडा आहे. पाठिमागील सुमारे दीड दशकांमध्ये ब्रिक्सने अनेक क्षमता प्राप्त केल्या आहेत. विविध मुद्द्यांची, प्रश्नांची सोडवणूक केली आहे. आज आपण जगतिक अर्थ्यव्यवस्थेतील एक महत्त्वाचा आवाज ठरलो आहोत. विकसनशिल देशांच्या विकासांवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी हे व्यासपीठ अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, पुढच्या 15 वर्षांमध्ये ब्रिक्स अधिक परिणामकारक दिसेन. भारताने आपल्या अध्यक्षतेसाठी जी संकल्पना निवडली आहे ती ही प्राथमिकता दर्शवत आहे -“BRICS at 15: Intra-BRICS Cooperation for Continuity, Consolidation and Consensus.” पंतप्रधानांनी पुढे सांगितले, नुकतेच “ब्रिक्स डिजिटल हेल्थ सम्मेलन” पार पडले. तांत्रिक मदतीने health access वाढविण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. नोव्हेंबर महिन्यात आमचे जलसंपदा मंत्री

(Minister of Water Resources) ब्रिक्स संकल्पनेत पहिल्यांदा भेटतील. असे पहिल्यांदा घडले आहे ब्रिक्सने “Multilateral systems भक्कमता आणि सुधारणा'' यांवर एक समान भूमिका घेतली आहे. आम्ही ब्रिक “Counter Terrorism Action Plan” स्वीकारला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, कोरोना व्हायरस महामारी असतानाही ब्रिक्सच्या 150 पेक्षा अधिक बैठका आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्यात 20 पेक्षा अधिक मंत्री स्तरावरील होत्या. सन 2021मध्ये भारत ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवत आहे. या बैठकीला ब्राझिलचे राष्ट्रपती जाईर बोलसोनारो, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्रपती शी जिनपींग आणि दक्षिण आफ्रीकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा उपस्थित होते.