मुंबई शेअर बाजार मध्ये आजही घसरण कायम; सेंसेक्स, निफ्टी गडगडले
Sensex (Photo credits: PTI)

मुंबई शेअर बाजारात आजही घसरण कायम आहे. दरम्यान आज आठवड्याचा पहिला दिवस आहे. परंतू कोरोना व्हायरसच्या दहशतीखाली असलेले बॉम्बे स्टॉक एक्स्चेंगमध्ये आजही निराशा कायम आहे. दरम्यान सकाळी 9.15 च्या सुमारास शेअर बाजार उघडले. त्यानंतर 1500 हून अधिक अंकांनी कोसळलेल्या अवस्थेत असलेलं मार्केट त्यानंतर घसरत राहिले. दरम्यान आज (16 मार्च) सकाळी 9 वाजून 34 मिनिटांनी सेन्सेक्स 6.08% घसरून 2073.05 अंकांनी गडगडले. त्यामुळे सेन्सेक्स 32.030.43 पर्यंत खाली आला होता. तर निफ्टीदेखील गडगडल्याने ती 9600 पेक्षा अधिक अंकांनी खाली घसरली होती.

शुक्रवार (13 मार्च) दिवशी मुंबई शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. निफ्टीने निच्चांक गाठल्याने त्यादिवशी मुंबई शेअर बाजारात 'ब्लॅक फ्रायडे' होता. तर त्यादिवशी निफ़्टी 45 मिनिटं तर सेन्सेक्स तासभर बंद करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा शेअर मार्केट उघडल्यानंतर हळूहळू शेअर बाजार सावरत असल्याचं चित्र आहे. दरम्यान आज मुंबई शेअर बाजारात पडझड कायम असली तरीही तो दिवसभर कशी कामगिरी करतो याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. Share Market: लोअर सर्किट आणि अपर सर्किट म्हणजे नेमकं, जाणून घ्या सोप्प्या शब्दात.

महाराष्ट्रात कोरोनाचे 33 बळी आहेत तर देशात हा बळींचा आकडा 110 च्या वर आहे. आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज प्रमाणे एशियन बाजारातही पडझड पहायला मिळाली आहे. गडगडणार्‍या शेअर बाजारचा परिणाम रूपयाच्या मूल्यावरही झाला आहे. आज अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रूपयामध्ये 14 पैशांची घट झाली असून तो 73.92 वर आला आहे.

आज इंडसइंड बैंक चे शेअर्स 11 % घसरले तर यासोबत  मॅग्मा फिनकॉर्प, जेएम फायनान्शिअल, मुथूट फायनान्स, आयसीआयसीआय बँक, उज्जीवन , ऍक्सिस बँक, आयडीएफसी फर्स्ट आदींच्या शेअर्समध्येही घसरण झाली.