Adar Poonawalla and Bill Gates: कोव्हिशील्ड मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाची अदर पुनावालांसह बिल गेट्स यांना नोटीस

दिलीप लुनावत (Dilip Lunawat) नामक व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute Of India) आणि मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेत दिलीप लुनावत यांची मुलगी स्नेहल लुनावत (Snehal Lunawat) हिचा कोरोना व्हिक्सिन (Corona Vaccine) कोव्हिशील्ड (Covishield) घेतल्यानंतर तिचा मृत्यू झाला असे मांडण्यात आले आहे. तरी मुलीच्या मृत्यूप्रकरणी दिलीप लुनावत यांनी सिरम इन्स्टिट्यूटसह बिल गेट्स यांच्याकडे 1,000 कोटींची भरपाई (Compensation) मागितली आहे. संबंधीत प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) सिरम इन्स्टिट्यूट आणि बिल गेट्सला नोटीस बजावला आहे. तरी न्यायालयाच्या या नोटीसीला अदर पुनावाला आणि बिल गेट्स कसा प्रतिसाद देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

 

न्यायमूर्ती एस व्ही गंगापूरवाला (Justices SV Gangapurwala) आणि माधव जामदार (Madhav Jamdar) यांच्या खंडपीठाने 26 ऑगस्ट रोजी या याचिकेवर नोटीस बजावली, बिल गेट्सच्या वतीने अधिवक्ता स्मिता ठाकूर (Smita Thakur) यांनी मुंबई उच्च न्यायालयाची ही नोटीस स्वीकारली. बिल गेट्स फाउंडेशनने कोविशील्डच्या निर्मितीमध्ये गुंतवणुक (Investment) केली होती. दिपक लुनावत यांची मुलगी स्नेहल लुनावत एक वैद्यकीय विद्यार्थी असुन तिला आश्वासन देण्यात आले की कोविड लस पूर्णपणे सुरक्षित आहे. ती आरोग्य सेविका असल्याने तिने कॉलेजमध्ये लस घेतली पण लसींच्या दुष्परिणामांमुळे 1 मार्च 2021 रोजी तिचे निधन झाले, असा दावा या याचिकेतून  करण्यात आला. (हे ही वाचा:- INS Vikrant: भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत आज देशाच्या नौदलात सामील)

 

लुनावत यांनी 2 ऑक्टोबर 2021 रोजी केंद्र सरकारच्या अ‍ॅडव्हर्स इव्हेंट फॉलोइंग लसीकरण (Adverse Events Following Immunization) समितीने कबूल केले की त्यांच्या मुलीचा मृत्यू कोविशील्डच्या दुष्परिणामांमुळे झाला आहे.दिलीप लुनावत यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (Drug Controller General of India) आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (All India Institute of Medical Science) चे संचालक यांनी लस सुरक्षित असल्याचे खोटे आश्वासन दिले होते. केंद्र सरकारला गुगल (Google), यूट्यूब (YouTube), मेटा (Meta) इत्यादी सोशल मीडिया (Social Media) कंपन्यांवर योग्य कारवाई करण्याचे निर्देश मागितले जे लसीच्या दुष्परिणामांमुळे होणाऱ्या मृत्यूंबद्दल योग्य डेटा दडपण्याचा कट रचत आहेत, असे आरोप दिलीप लुनावत यांनी केले आहेत.